news

‘प्रत्येकाची स्वप्नं असतात माझंही एक मोठं स्वप्न पूर्ण होतंय’…अक्षया देवधरचा आनंद गगनात मावेना

माझं मोठं स्वप्न पूर्ण होतंय…असे म्हणत अभिनेत्री अक्षया देवधर हिने नुकतेच व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करत असल्याचे जाहीर करत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षया देवधर हिने एक व्हिडिओ शेअर करत नवीन काहीतरी घेऊन येत असल्याची हींट दिली होती. तिच्या या व्हिडीओतून अक्षया कुठलातरी व्यवसाय करणार असे त्यातून कळले होते. ‘B’ या अक्षरावर तिने टॅग केलेले पाहायला मिळाले होते तेव्हा तिच्या या व्यवसायाचे नाव त्या अक्षरावरून असल्याचे दिसून आले. आता हा व्यवसाय नेमका कोणता आहे याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती. पण नुकताच या व्यवसायाबद्दल तिने एक मोठा खुलासा केलेला आहे. ‘Bharjari by NAM’ या नावाने अक्षयाने हा कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. NAM या नावामागे एक खास कारण आहे. निधी, अक्षया आणि माधुरी अशा तिघी मैत्रिणींनी मिळून या व्यवसायाची सुरुवात केली आहे.

मोठ्यातल्या मोठ्या स्वप्नापैकी एक पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतंय असे म्हणत अक्षयाने तिच्या या स्वप्नाचा पाठलाग केला होता. यात तिला तिच्या जवळच्या खास मैत्रिणी निधी आणि माधुरीची मोठी साथ मिळाली. भरजरी बाय नाम या त्यांच्या ब्रॅंडमध्ये लहान मुलांचे कपडे खरेदी करता येणार आहेत. ब्राईडल साड्या तसेच सिल्कच्या साड्या, पैठणी, कांजीवरम , बनारसी, चंदेरी या साड्यांच्या भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. दरम्यान ही सेवा ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्हींमार्फत दिली जाणार असल्याचे तिने म्हटले आहे. आमच्या तिघींनी एकत्रित पाहिलेलं हे स्वप्न आज पूर्ण होत असल्याचा आनंद अक्षया सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. भरजरी बाय नाम हे कपड्यांचे दालन पुण्यात सुरू करण्यात आले आहे. लवकरच या दलनाचा पत्ता जाहीर करण्यात येईल असेही तिने म्हटले आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे अक्षयाला मोठी लोकप्रियता मिळाली होती. हार्दिक जोशी सोबत लग्न झाल्यानंतर अक्षयाकडे फारसे काही प्रोजेक्ट आले नव्हते. दरम्यान पुण्यात स्थायिक असलेल्या तिच्या मैत्रिणींसोबत व्यवसायात पाऊल टाकण्याचा तिने निर्णय घेतला. हार्दिक जोशी हा देखील कोल्हापूर येथे रानादा या नावाने थंडाईचा व्यवसाय करत आहे. हळूहळू या व्यवसायाचा व्याप त्याने वाढवलेला पाहायला मिळाला. अभिनयाच्या जोडीला व्यवसाय असावा या उद्देशाने अक्षयानेही आता व्यवसायाकडे आपला मार्ग वळवला. तिच्या या व्यवसाय क्षेत्रातील पदार्पणासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button