news

बिग बॉसचे कंटेस्टंट आता आले समोर..बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीतून हा स्पर्धक होता गायब

कलर्स मराठी वरील बिग बॉसच्या शोची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. २८ जुलै रोजी मराठी बिग बॉसच्या ५ व्या सिजनची सुरुवात होत आहे. त्यामुळे या घरात कोणकोणत्या स्पर्धकांना सहभागी होण्याची संधी मिळणार हे पाहणे रंजक ठरले आहे. केदार शिंदे कलर्स मराठी वाहिनीचे हेड झाले आणि वाहिनीची सगळी सुत्रच त्यांनी बदलून टाकलेली पहायला मिळाली. दरम्यान नवनवीन मालिका आणल्यानंतर त्यांनी प्रेक्षकांच्या मागणीनुसार बिग बॉसच्या शोची घोषणा केली. कामात व्यस्त असल्याने महेश मांजरेकर यांनी या शोचे सूत्रसंचालन करण्यास नकार दर्शवला. त्यांच्या जागी कोणीतरी तगडा होस्ट असावा या विचाराने रितेश देशमुखकडे ही धुरा सांभाळायला दिली. पण प्रेक्षकांनी रितेशवर टीका केली, अर्थात महेश मांजरेकर यांच्याशी तुलना होणे स्वाभाविकच आहे पण मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास त्याने प्रेक्षकांना दिला आहे.

नुकतेच या सोहळ्याचे ग्रँड प्रीमियर पार पडले आहे. या शोमध्ये एन्ट्री घेणाऱ्या पहिल्या सदस्याची झलक समोर आली असून हा सहभागी होणारा कंटेस्टंट कोण? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत. ‘राधा ही बावरी…’ या गाण्याने या गायकाची शोमध्ये एन्ट्री होत आहे त्यामुळे हा गायक स्वप्नील बांदोडकर असावा असा अंदाज बांधण्यात आला. अर्थात हे गाणं त्याचं आहे त्यामुळे प्रेक्षकांनी त्याचे नाव घेतले. मात्र हा गायक स्वप्नील बांदोडकर नसून अभिजित सावंत आहे असे म्हटले जात आहे. अभिजित सावंत हा इंडियन आयडॉलच्या पहिल्या वहिल्या सिजनचा विजेता आहे. हा शो जिंकल्यानंतर अभिजीतने अनेक गाणी गायली. पण म्हणावी तशी त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. मध्यंतरी तो या इंडस्ट्रीतूनच गायब झाला असल्याचे त्याच्या बाबतीत बोलले जाऊ लागले. पण आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर अभिजित सावंत मराठी बिग बॉसच्या शोमधून प्रेक्षकांसमोर येत आहे.

abhijeet sawant in big boss marathi
abhijeet sawant in big boss marathi

एकीकडे हा पाठमोरा गायक अभिजित सावंत आहे असे म्हटले जात आहे पण दुसरीकडे हा गायक संजू राठोड असल्यानचेही म्हटले गेले आहे. कारण गुलाबी साडी या गाण्यामुळे संजू राठोडच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. तसेच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या अनंत अंबानीच्या लग्नाच्या वरातीत त्याने गुलाबी साडी गाणं गाऊन वऱ्हाडीमंडळींना थिरकायला लावले होते. त्यामुळे हा कंटेस्टंट संजू राठोड असावा असेही म्हटले जात आहे. त्यामुळे हा गायक अभिजित सावंत असेल की संजू राठोड याबद्दल लवकरच उलगडा होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button