९० च्या दशकात धुमाकूळ घातलेल्या अभिनेत्यांच्या लग्नाचे फोटो पाहायला सर्वांनाच आवडेल. पण ते फोटो सहजा सहजी उपलब्ध नसल्याने बऱ्याचदा अनेकांची हिरमोड होतो. म्हणूनच त्या काळच्या काही गाजलेल्या मराठी कलाकारांच्या लग्नाचे खास फोटो आम्ही त्यांच्या चाहत्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत. तुम्हाला हे फोटो नक्कीच आवडतील यात शंका नाही. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, निळू फुले, रवींद्र महाजनी, प्रशांत दामले, सचिन खेडेकर यांच्या लग्नातले हे काही खास आठवणीतले हे फोटो बरच काही सांगून जातात..
अशोक सराफ आणि निवेदिता जोशी ह्यांनी २७ जून १९९० साली गोव्यातील मेंगेशी मंदिरात प्रेमविवाह केला.मोजकेच कलाकार आणि घरची मंडळी लग्नाला उपस्तित होते. लग्नाचा गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने अशोक सराफ आणि निवेदिता सराफ दोघांनी लग्न केलं. अनिकेत सराफ हा त्यांचा एकुलता एक मुलगा.
पहिली पत्नी रुही बेर्डे हिच्या मृत्यू नंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अभिनेत्री प्रिया बेर्डे हिच्याशी लग्नगाठ बांधली. १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानांतर १९९८ साली हे दोघे लग्न बंधनात अडकले. अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे अशी ह्या दोघांना अपत्ये आहेत.
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ह्यांनी देखील १९८५ साली प्रेमविवाह केला. सचिन आणि सुप्रिया ह्या दोघांनी मात्र अगदी थाटा माटात लग्न केलं. लग्नाआधीच अनेक चित्रपटात दोघे झळाळकले होते त्यांची जोडी सुपरहिट ठरेल असं अनेकांनी भाकीत देखील केलं होत जे तंतोतंत खरं देखील ठरलं.
अभिनेते निळू फुले ह्यांनी १९७५ साली रजनी फुले यांच्याशी लग्न केलं. एक अष्टपैलू कलाकार म्हणून त्याकाळी ते खूप प्रसिद्ध होते. निळू फुले आणि रजनी फुले यांना गार्गी फुले थट्टे हि मुलगी आहे. गार्गी फुले थट्टे हि देखील मराठी मालिका आणि चित्रपटात काम करते.
रवींद्र महाजनी यांनी माधवी महाजनी हिच्याशी लग्नगाठ बांधली. स्ट्रगल सुरू असताना झुंज या चित्रपटाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. याचदरम्यान रविंद्र महाजनी माधवीच्या प्रेमात पडले. त्या तरुण वयात माधवी अतिशय देखण्या दिसत होत्या.
२७ डिसेंबर १९८५ साली अभिनेते प्रशांत दामले आणि गौरी ह्यांचं लग्न झालं. लग्नानंतर लगेचच २ दिवसांनी सलग तीन प्रयोग असल्याने त्यांना घराबाहेर पडावे लागले. “नवीन लग्न झालेले असूनही याची तक्रार माझ्या पत्नीने केली नाही. तिने वेळोवेळी दाखवलेल्या समजूतदारपणामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो.” असं ते म्हणतात.
१९ डिसेंबर १९९३ साली अभिनेते सचिन खेडेकर ह्यांनी जलफा हिच्याशी विवाह केला. सचिन खेडेकर ह्यांना दोन मुले आहेत. आपल्या आयुष्यात पत्नीने वेळोवेळी साथ दिली म्हणून मी आज इथवर पोहचलो असं ते म्हणतात.