शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात पण… घटस्फोटानंतर अनिकेत विश्वासराव प्रथमच झाला व्यक्त
अनिकेत विश्वासराव हा मराठी चित्रपट, मालिका अभिनेता आहे. बस स्टॉप, पोश्टर बॉईज , पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर या आणि अशा काही मोजक्या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १९ जुलैला ‘डंका’ हा त्याचा अभिनित असलेला चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रदीप खानविलकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, सयाजी शिंदे, रसिका सुनील हे कलाकार त्याच्यासोबत चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अनिकेतने पहिल्यांदाच घटस्फोटाच्या प्रक्रियेवर भाष्य केलं आहे.
त्या घटनेने अनिकेत विश्वासराव याच्यावर पत्नीने अनेक आरोप प्रत्यारोप लावले होते. पण यावर नुकतेच त्याने त्याचे मत मांडलेले पाहायला मिळत आहे. २०२१ मध्ये अनिकेत विश्वासराव याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने अनिकेतवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप लावले होते. पुण्यातील अलंकार पोलीस चौकीत तिने ही तक्रार नोंदवली होती. २०१८ साली लग्न झाल्यानंतर दोन वर्षातच या दोघांमध्ये बिनसले. अनिकेत आणि त्याचे आईवडील आपल्याला मारहाण करतात अशी तक्रार तिने नोंदवली होती. यानंतर दोघांनीही घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. काही महिन्यातच या दोघांना कायदेशीररित्या घटस्फोट मिळाला.
यावर अनिकेत म्हणतो की, ” या गोष्टीचा निश्चितच कुठेतरी मानसिक त्रास झाला , पण जे झालं त्याचा अतिशय आनंद आहे.पण ती जी काही प्रोसेस आहे त्यातून तर जावंच लागतं. पण लॉयरच्या रुपात मला एक छान मित्र भेटला. हायकोर्टानेच हा अंतिम निर्णय दिला. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये ही जी म्हण कोणी काढलीये तो खूप विक माणूस असेल कोणीतरी. जायचं! मी आताही सगळ्यांना तेच सांगतो की बिनधास्त जायचं, काहीही होत नाही.आपली न्यायव्यवस्था खूप चांगली आहे त्यावर विश्वास ठेवायचा.”