news

भाग्य दिले तू मला मालिकेतील अभिनेत्रीच्या घरी झाली चोरी…चोरांनी मोलाचा ऐवज केला लंपास

प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्या घरी चोरी झाल्याचे समोर आले आहे. घरातून मोलाचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत अशी माहिती तिने दिली आहे. पण या घटनेमुळे जान्हवीच्या आईला मायनर अटॅक येऊन गेला त्यामुळे तिची आई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली असल्याचे ती सांगते. जान्हवीने एक व्हिडिओ शेअर करत या चोरीच्या घटनेची माहिती दिली आहे. जान्हवी किल्लेकर हीने भाग्य दिले तू मला या लोकप्रिय मालिकेत विरोधी भूमिका साकारली होती. याशिवाय व्हिडीओ सॉंग आणि मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. जान्हवीने या चोरीच्या घटनेची माहिती देताना सतर्क राहण्याचा सल्ला देखील दिला आहे.

जान्हवी किल्लेकर हिच्या आईचे घर पेनमध्ये आहे. वीकेंडला हे सगळं कुटुंब या घरी राहायला जात असतं. पण मागच्या आठवड्यात ते तिथे गेले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त आढळल्या. मोठ्या मोलाच्या वस्तू या घरातून चोरीला गेल्याचे ती सांगते. जान्हवीच्या भावाकडे महागड्या घड्याळाचे कलेक्शन होते ती सगळी घड्याळं चोरांनी लंपास केल्याचे तिला आढळले. हे घर वीकेंडला राहायला जाता यावं म्हणून बांधण्यात आलं होतं. शहराच्या गर्दीतुन कुठंतरी निवांत वेळ घालवता यावा म्हणून मोठ्या हौसेने त्यांनी हे घर बांधलं होतं. दार आठवड्याला तिथे जात असल्याने गरजेच्या सगळ्या वस्तू त्या घरात त्यांनी ठेवल्या होत्या. पण बऱ्याचदा घराला लॉक असल्याने काही लोक चोरीच्या उद्देशाने या घरावर नजर ठेवून असावेत असा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान पेन आणि पनवेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत.

Jahnavi Kiran Killekar with mother
Jahnavi Kiran Killekar with mother

त्यामुळे ज्यांची अशी घरं आहेत त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असे जान्हवीचे चाहत्यांना म्हणणे आहे. निवांत ठिकाणी अनेकजण अशी घरं बांधतात. बऱ्याचदा अशा ठिकाणी जाणं होत नाही त्यामुळे चोरांना आयती संधी मिळाल्यासारखे होते. या चोरीच्या घटनेचा धसका जान्हवीच्या आईने घेतल्याने त्यांना एक मायनर अटॅक येऊन गेला. उपचारासाठी आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. ती या संकटातून बाहेर पडली असून ती सुखरूप आहे असे तिने म्हटले आहे. पोलिसांकडे या घटनेची तक्रार दिली असली तरी चोर पकडले जातील याची शाश्वती देणे कठीण आहे कारण ही चोरी नेमकी कोणत्या दिवशी झाली याची माहिती त्यांना देता आली नाही. पण आता एक खबरदारी म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button