शेर अकेला आता है म्हणणाऱ्या किरण मानेना मेघा धाडेचे सणसणीत उत्तर…तुम्ही तर सगळेच सामूहिक भीक मागताय हिम्मत असेल तर
गेल्या काही दिवसांपासून देशभरात राजकीय निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळाचा निरोप देऊन पुढच्या शपथविधीची तयारी सुरू केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत हा जनतेने कौल दिला आहे, मात्र यावेळच्या निवडणुकीत महाराष्ट्रात वेगळा निकाल लागलेला पाहायला मिळाला. महाविकास आघाडीला जास्त मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली पाहायला मिळाली. हा जनतेने दिलेला निर्णय आहे ते मान्य करूनच आता पुढची निवडणूकीची तयारी सुरू करण्यास सर्व पक्ष सज्ज झालेले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात हा बदल घडून येत असल्याचे पाहून मविआ कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
अभिनेते किरण माने यांनीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने मत मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या अशाच आशयाच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण किरण माने यांच्या या पोस्टवर अभिनेत्री मेघा धाडे हिने एक सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे किरण मानेंच्या पोस्टवर राजकीय खडाजंगी सुरू झालेली आहे. किरण माने यांनी एक पोस्ट शेअर करताना “शेर एकेला आता है” असे म्हणत राहुल गांधी यांचा एकटा फोटो आणि नरेंद्र मोदी यांचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. या फोटोला ‘भक्तूल्यांचे हिशोब चुकते करायची संधी सोडू नका भावांनो!’ असे त्याला कॅप्शन दिले आहे. अर्थात किरण माने यांच्या पोस्टवर समर्थकांच्या नेहमीच उड्या पडत असतात पण आता स्वतः अभिनेत्री मेघा धाडे यांनी किरण मानेना एक चूक लक्षात आणून दिली आहे.
राहुल गांधीला उद्देशून शेर अकेला आता है म्हणणाऱ्या किरण माने यांना मेघा धाडे आठवण करून देते की, ” स्कोअर जरा पुन्हा एकदा क्लिअर करूया का???… अकेला शेर २४१…अकेला सुअर ९९ आणि सगळे सुअर मिळून २३४.” आता मेघा धाडे हिच्या या उत्तरामुळे तिच्या कमेंटपुढे मविआच्या समर्थकांच्या उड्या पडल्या आहेत. राहुल गांधी किती सरस आहेत हे दाखवून देण्यासाठी त्यांची जणू चढाओढच सुरू झालेली आहे. महायुती भीक मागते असे तिला उत्तर मिळाल्याचे पाहून या मेघा धाडेने ट्रोलर्सला देखील उत्तर देताना म्हटले आहे की, ” भीक???…कोणी मागितलीये???. सरकार बनवायला २७२ सीट्स लागतात. एनडीएकडे ऑलरेडी २९८ आहेत. आणि बाय द वे तुम्ही तर सगळेच सामूहिक भीक मागतायेत. I.N.D.I.A. आघाडी बिघाडी बनवून. हिम्मत असेल तर बीजेपी विरुद्ध एकएकाने स्वतंत्र येऊन दाखवा. लायकी कळेलच. आय मीन कळालीच आहे.” असे म्हणत मेघा धाडे हिने त्यावर स्पष्टीकरणही दिलेले पाहायला मिळत आहे. मेघा धाडे हिच्या या उत्तरावर अजून किरण माने यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.