महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कलाकाराच्या घराचं स्वप्न पूर्ण… लग्नाच्या आधीच बांधला सुदर बंगला
गेल्या काही दिवसात मराठी कलाकारांना सुगीचे दिवस आलेत असेच चित्र पाहायला मिळत आहे. कारण ही कलाकार मंडळी हक्काचं घर, आलिशान गाडी खरेदी करत आपली स्वप्न पूर्णत्वास आणत आहेत. मराठी चित्रपट मालिकांतून काम करत असताना या कलाकारांना आता मोठे मानधन मिळू लागले आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील कलाकारांनीसुद्धा चांगले मानधन घेऊन हक्काची घरं साकारली आहेत. लेखक अभिनेता अशी ओळख मिळणाऱ्या हास्यजत्रेतील हिरा म्हणजेच प्रथमेश शिवलकर याचेही असेच स्वप्न पूर्णत्वास आले आहे. अर्थात स्वप्नपूर्तीची ही मालिका अजूनही सुरूच आहे कारण काही दिवसांपूर्वी प्रथमेश शिवलकर याने महिंद्राची थार ही गाडी खरेदी केली होती. या गाडी नंतर त्याची आणखी एक स्वप्नपूर्ती पूर्णत्वास येत आहे अशी एक हिंट त्याने दिली होती.
ही आनंदाची बातमी आज त्याने शेअर केलेली पाहायला मिळत आहे. प्रथमेशने त्याच्या गावी मोठ्या दिमाखात टुमदार घर उभारलं आहे. कालच त्याने या त्याच्या नवीन घरात गृहप्रवेश केलेला आहे. गावी असलेल्या घराचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी प्रथमेशने घेतली होती. जुन्या घराच्या जागी त्याला हवं तसं घर त्याने बांधून घेतलं आहे. एखादया बंगल्याप्रमाणे त्याने या घराला लूक दिला आहे. “शिवार्पण” असं या स्वप्नातील घराला त्याने नाव दिलं आहे. प्रथमेशची ही आणखी एक स्वप्नपूर्ती झालेली पाहून महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कलाकारांनी त्याचे अभिनंदन केले आहे. थार गाडी आणि आता या घराच्या स्वप्नपूर्तीनंतर आणखी एक स्वप्नपूर्ती लवकरच पूर्णत्वास येईल असेही त्यात त्याने म्हटले आहे. त्यामुळे प्रथमेश आणखी कोणती आनंदाची बातमी देणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान तो लवकरच लग्न करणार का असेही बोलले जात आहे. त्याने यासंदर्भात लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, यांजसाठी केला होता अट्टाहास भाग २: शिवार्पण शहरापासून दूर हक्काची एक वास्तु असावी; जिथे निर्मळ शांतता अनुभवता यावी…..मातीच्या सुगंधाने दरवळत रहावा तिथला प्रत्येक क्षण; अशीच स्वप्नातली वास्तु झाली साकार नाव तिचे “शिवार्पण” ज्या वास्तुत आपण लहानाचे मोठे होतो , त्या वास्तुला जेव्हा मोठं करण्याची संधी आपल्याला मिळते……तेव्हा त्या वास्तुचे ऋण फ़ेडन्याचा केलेला छोटा प्रयत्न म्हणजेच ……”शिवार्पण” हक्काचं शेतघर