अंडर कन्स्ट्रक्शन प्लॅटमुळे अंशुमन विचारेला मनस्ताप २०२३ उलटूनही… घर खरेदी करताना विचार करा नाहीतर
कॉमेडीची बुलेट ट्रेन, फु बाई फु, महाराष्ट्राची हास्यजत्रा या आणि अशा कितीतरी कलाकृतीतून, नाटक, सिनेमामधून अंशुमन विचारेने त्याच्या सहजसुंदर अभिनयाची छाप पाडली आहे. या प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव त्याला आले आहेत. त्यात पत्नी पल्लवीची भक्कम साथ त्याला मिळत आलेली आहे. अंशुमन विचारेने काही दिवसांपूर्वी घर खरेदी केलं असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. पण आता या नव्या घरात राहायला जाण्यासाठी अंशुमनला आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. २०२३ मध्ये त्याला या नवीन फ्लॅटचा ताबा मिळणार होता. पण आता जवळपास दीड वर्ष तरी त्या घराचा ताबा मिळणार नाही असे बिल्डरकडून कळवण्यात आले आहे.
त्यामुळे ‘अंडर कन्स्ट्रक्शन’ घर खरेदी करताना विचार करा असे अंशुमनच्या पत्नीने चाहत्यांना सल्ला दिला आहे. आपल्याला दिलेल्या वेळेत घराचा ताबा मिळत नसल्याने अंशुमन आणि त्याची पत्नी वैतागले आहेत. पण पेशन्स असल्याने आणि नातेवाईकांचा सपोर्ट असल्याने त्यांनी अजूनही आस सोडलेली नाही असे त्यांनी म्हटले आहे. पल्लवी आणि अंशुमन विचारे हे त्यांच्या युट्युब चॅनलमुळे चाहत्यांच्या आणखी जवळ आले आहेत. नुकत्याच एका व्हीडीमध्ये त्यांनी रेंटवर असलेल्या घराचा ताबा सोडला आहे. हक्काचं घर अजूनही मिळत नसल्याने त्यांना रेंटचे घर सोडावे लागले आहे. त्यामुळे घराचे समान शिफ्टिंग करताना नाकी नऊ येतंय असं त्यांनी म्हटलं आहे. २०२० मध्ये अंशुमन विचारे याने अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट बुक केला होता. २०२३ मध्ये या फ्लॅटचा ताबा मिळेल असे त्यांना सांगण्यात आले होते. यादरम्यान अंशुमन पत्नी सह भाड्याच्या घरात राहत होता. २०२३ उलटूनही आपल्याला घराचा ताबा मिळाला नाही त्यामुळे कोणीही अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट बुक करताना अगोदर विचार करा, तुमच्यात पेशन्स असतील तरच असं घर खरेदी करा असा सल्ला पल्लवीने दिला आहे. दरम्यान हे दोघे ज्या घरात भाड्याने राहत होते तिथले ऍग्रिमेंट संपले असल्याने त्यांना दुसरे घर शोधावे लागले आहे.
त्यामुळे स्वतःच्या घरात कधी एकदा राहायला जाऊ अशी त्यांची अवस्था झाली आहे. पण या भाड्याच्या घराने आम्हाला खूप चांगला अनुभव दिला, या घराने आर्थिक स्थैर्य मिळवून दिले, चांगल्या गोष्टी घडल्या अशी ती आठवण सांगते. ‘भाड्याच्या घरात राहायचे असेल तर मालक सांगेल तेव्हा घर खाली करावे लागते. आम्ही दोघेही स्वतःच्या घरात राहिलो आहोत पण आता गेल्या चार पाच वर्षांपासून आम्ही भाड्याच्या घरात राहतो. जे लोक भाड्याच्या घरात राहतात त्यांची सहनशक्ती खूप मोठी आहे. आम्हालाही आता ते घर खाली करावं लागलं पण आता तीन दिवस झाले आम्ही ह्या नवीन भाड्याच्या घरात सामान शिफ्ट करत आहोत. याचमुळे आम्ही व्हिडीओ बनवणं देखील बंद केलं आहे . कधीकधी तर तयार होऊनही आम्ही फोटो काढण्याचे विसरू लागलो आहोत. सुदैवाने बिल्डरशी आमचे सुसंवाद आहेत त्यांनी अजून दीड वर्ष थांबण्यास सांगितले आहे. आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही. ते घर आम्ही खरेदी केलं त्यानंतर आता त्या घराची किंमत खूप वाढली आहे. त्यामुळे तुमच्याकडे पेशन्स असतील तरच अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट खरेदी करा ‘ असे पल्लवी विचारे आणि अंशुमन विचारे यांचे म्हणणे आहे.