ट्रोलर्स ९० टक्के कमेंट्स टॉयलेटमध्ये बसून करतात खालून … शिवाजीपार्कला ७ ला मी तिथे उभा राहतो आणि चपलेने मारायला
काही विशिष्ट गाण्यांसाठी अवधूत गुप्तेला संगीत क्षेत्रात एक वेगळी ओळख मिळाली आहे. संगीतकार, गीतकार, गायक या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या समोर आलेला आहे मात्र खुपते तिथे गुप्तेच्या शोमधूनही तो सूत्रसंचालक म्हणून एक वेगळी ओळख बनवत आहे. राजकारण्यांच्या मुलाखती त्याच्या विशिष्ट शैलीमुळे खूपच गाजल्या होत्या. या सर्वातून अनेकदा त्याला ट्रोलही करण्यात आलं किंवा त्याची गाणी रिमिक्स असतात अशीही एक चर्चा त्याच्या बाबतीत पाहायला मिळाली. या ट्रोलिंगवर अवधूत गुप्तेने एक वक्तव्य केले आहे. त्याचं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अवधूत गुप्ते परखडपणे आपली मतं व्यक्त करताना दिसला. या पाच तत्वांवर अवधूत त्याचे प्रोजेक्ट स्वीकारतो.
त्याबद्दल तो म्हणतो की,” फेम, मनी, एज्युकेशन, कॉन्टॅक्ट आणि सॅटिसफॅक्शन या पाच गोष्टींचा मी विचार करतो. १०० मार्कांच्या पेपरमध्ये फेम मिळणार असेल तर या बाकी चारही गोष्टी नाही मिळाल्या तरी मला चालतील. हिंदी मध्ये जर मला प्रसिद्धी मिळणार असेल तर त्यात मी पैसा बघणार नाही. पण फेम आणि मनी या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. कारण जर पैसे मिळणार असतील तर काकांना अंघोळ करताना माझं गाणं ऐकायचं असेल तर मी गिटार घेऊन बाथरूमच्या बाहेर उभं राहून त्यांना गाणं ऐकवू शकतो. गोशाळेत मी एक कार्यक्रम केला तिथे मला सॅटिसफॅक्शन मिळतं. ह्या तत्वावर मी बाकीच्या पाच गोष्टींचा विचार करतो. जर ह्या पाचही गोष्टी कुठेच बसत नसतील तर मी ती डील कॅन्सल करतो.” कामाच्या बाबतीत अवधूत खूप चुजी आहे असे त्याच्या मतावरून तरी दिसत आहे.
त्याच्या मते “आज जे ट्रोलिंग करतात ना त्याच्यामधल्या ९० टक्के कमेंट्स ह्या टॉयलेटमध्ये बसून टाईमपासला केलेल्या असतात. स्थळ आणि तेच असतं. एका ठिकाणी खालून वेगळं होत असतं आणि हातातून कमेंट होत असतं इतकं ते सिमीलर आहे. त्यांच्यातल्या एकाने सांगितलं ना तुझी ही कमेंट्स इतकी महत्वाची वाटते तर मला ट्रोल करायला उद्या संध्याकाळी शिवजीपार्कला ये सात वाजता मी तिथे उभा राहतो आणि चपलेने मारायला तू ये…तो येणार नाही… त्याला वेळ नसेल कारण त्याला फक्त तीकडनंच ट्रोल करायचं असतं . ऐका दाजीबाच्या आधीपासूनच मी ट्रोल होत होतो की हे रिमिक्स बनवण्यात आलं आहे पण हे रिमिक्स नाहीये त्यातले शब्द माझे आहेत. तुझे देखके मेरी मधुबाला हे शब्द कशातले आहेत तर बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला यामधून एक वाक्य घेतलं त्यामुळे ते रिमिक्स होऊ शकत नाही, त्याला कॉम्बो म्युजिक म्हणतात. झुमका गिरा रे हे सुद्धा कशातून घेतलेलं आहे. आताही अशी अनेक गाणी पाहायला मिळतात ज्याची सुरुवात मी केली .यावर निषेध वगैरे बरेच झाले पण आता ट्रोलिंगवर मी विशेष लक्ष देत नाही.”