कित्तेक दिवसापासून आम्ही एकमेकांशी बोलतही नाही याला त्याची पत्नी जबाबदार… रिवाबामुळे गोष्टी इतक्या विकोपाला गेल्यात कि
रवींद्रसिंह अनिरुद्धसिंह जडेजा भारतीय क्रिकेटर आणि त्याची पत्नी रिवाबा नेहमीच एकमेकांच्या सोबत असलेले पाहायला मिळतात. एक सुसंस्कृत बायको म्हणून लोक नेहमीच तिचं उदाहरण सांगतात. आयपीएलच्या अंतिम सामन्यात डोक्यावर पदर आणि मैदानात येताच आपल्या पतीचे पाय धरून आशिर्वाद घेऊन दोघांनी भारतीय संस्कृतीचं सुंदर दर्शन घडवलं. यामुळे रवींद्रसिंह जडेजाची पत्नी रिवाबा चांगलीच प्रकाश झोतात आली. जडेजाने 17 एप्रिल 2016 रोजी राजकारणी रिवाबा सोलंकी यांच्याशी विवाह केला. ती भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून गुजरात विधानसभेची सदस्य आहे. पण नुकतंच रवींद्रसिंह जडेज्याचे वडील अनिरुद्धसिंह जडेजा यांनी रिवाबा आपल्याशी कशी वागली आणि तिच्यामुळे माझ आयुष्य कसं धुळीस मिळालं ह्याचा गौप्यस्फोट केला आहे.
रवींद्रसिंह आणि त्याचे वडील अनिरुद्धसिंह जडेजा हे कित्तेक दिवस एकमेकांपासून दूर राहत आहेत. दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रिवाबा बद्दल खुलासा केला आहे. त्याच्यात जेव्हापासून भांडण व्हायला सुरवात झाली तेंव्हापासून आजवर रवींद्र माझ्याशी बोलत देखील नसल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी केला आहे. रवींद्रच्या लग्नानंतर रवींद्र पूर्णपणे बदलून गेला आहे. आम्ही एकाच शहरात राहत असलो तरी आमच्यात काहीच संभाषण होत नाही. रवींद्रचं लग्न झालं तेंव्हापासून तिने त्याच्यावर काय जादू केली कोणास ठाऊक, तो माझा मुलगा आहे तो माझ्यापासून दूर गेला याच मला खूप दुःख आहे. त्याच्याबद्दल त्याच्या खेळाबद्दल ऐकून वाचून खूप छान वाटतं पण तो दुरावला ह्यामुळे मनाला खूप वेदना होतात. त्याच लग्न झालं नसतं तर आज आम्ही एकत्र असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला बोलायचं नाही पण त्याचा दुरावा मला सहन होत नाही.
जडेजाने देखील एक पोस्ट शेअर करून वडिलांची संपूर्ण मुलाखत चुकीची असल्याचे म्हटले आहे. स्क्रिप्टेड मुलाखतीत जे बोलले होते त्याकडे दुर्लक्ष करा असे तो म्हणाला. जडेजाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “प्रकाशित झालेल्या निरर्थक मुलाखतीत जे काही बोलले गेले ते चुकीचे आणि निरर्थक आहे. त्या मुलाखतीत फक्त एक बाजू सांगण्यात आली आहे, ज्याचा मी इन्कार करतो. माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अतिशय निंदनीय आणि अशोभनीय आहे. मलाही खूप काही सांगायचे आहे, जे मी जाहीरपणे सांगत नाही तोपर्यंतच ठीक आहे.”