प्रसिद्धीसाठी काहीही करणार का… पूनमने स्वतः लाईव्ह येऊन म्हणते “मला माफ करा माझ्या मृत्यूच्या बातमीने सगळीकडे
काल पूनम पांडे हिचा सर्व्हाईकल कॅन्सरने मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. पूनम पांडे चे निधन सगळ्यांनाच हादरवून टाकणारे ठरले होते. तिचे जुने व्हिडीओ देखील व्हायरल होऊ लागले होते. तिच्या मृत्यूने अनेकांनी खेद व्यक्त केला होता. यानंतर सगळ्यांनी कॅन्सरवर बोलण्यास, व्यक्त होण्यास सुरुवात केली होती. कॅन्सरमुळे अचानक मृत्यू होऊ शकतो. त्यावर लस उपलब्ध करण्यात आली असेही मीडियाने निदर्शनास आणून दिले. एक दिवस संपूर्ण देश कॅन्सरवर भर देताना दिसला. हा किती गंभीर आजार आहे यावर लक्ष केंदीत केले जाऊ लागले. पूनम पांडे खरंच मृत्यू झाला या गोष्टीवर अनेकांना विश्वास बसत नव्हता पण ही बातमी सर्वच माध्यमांनी व्हायरल केल्याने या गोष्टीवर जास्त फोकस केला जाऊ लागला.
पण आज काहीवेळापूर्वीच पूनम पांडे जिवंत असल्याचे समोर आले. पूनमने स्वतः लाईव्ह येऊन तिच्या चाहत्यांचे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले. माझ्या मृत्यूच्या बातमीने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात आली याबद्दल तिने सगळ्यांची माफी देखील मागितली. पण याबद्दल ती स्पष्टीकरण देताना म्हणते की, माझ्या मृत्यूच्या बातमीने तुम्ही कॅन्सरवर व्यक्त होऊ लागला. सर्व्हाईकल कॅन्सर किती गंभीर आजार आहे हे माझ्या मृत्यूने तुमच्या लक्षात आणून दिले . तुम्ही या आजाराबद्दल व्यक्त होऊ लागला, लसीकरणाला प्रोत्साहन देऊ लागला या कामात माझा हातभार लागल्याने मी स्वतःला नशीबवान समजते. असे म्हणत पूनम पांडेने तिच्या चाहत्यांना सर्व्हाईकल कॅन्सरबद्दल जागरूक केले आहे. आणि लसीकरणाला पुढे या असेही म्हटले आहे. दरम्यान पूनम पांडे जिवंत असल्याचे पाहून आणि ही स्टंटबाजी पाहून लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
प्रसिद्धीसाठी काहीही करणार का अशा प्रश्नांना तिला आता सामोरे जावे लागत आहे. पण शासनाने देखील सर्व्हाईकल कॅन्सरवर जनजागृती केली होती. पण त्याला एवढा प्रतिसाद मिळत नव्हता. पूनम पांडेला पुढे करून हा उद्देश साधला जातोय का अशीही आता चर्चा होऊ लागली आहे. पूनम पांडेचा मृत्यू हे एक निमित्त होते पण असा मृत्यू कधीही होऊ शकतो ही बाब लोकांच्या निदर्शनास आणून दिली जात आहे. त्याचमुळे सर्व्हाईकल कॅन्सरवरील लसीकरण किती महत्वाचे याबद्दल आता चर्चा होऊ लागली आहे. तिच्या मृत्यूच्या बातमीने हे साध्य केले असे आता म्हणायला हरकत नाही.