अशी होती मिताली आणि सिध्दार्थची पहिली भेट…सुरवातीला दुसऱ्यांसोबत एंगेज असूनही घेतला लग्न करण्याचा निर्णय
अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असलेला “श्रीदेवी प्रसन्न” हा आगामी मराठी चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांनी मुलाखती दिल्या आहेत. चित्रपटाव्यतिरिक्त खऱ्या आयुष्यात या दोघांचे बॉंडिंग खूप छान जुळलेले आहे. या मुलाखतीत दोघांनी एकमेकांबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सिद्धार्थसोबत असला की आम्ही खूप धमाल करतो असे सई आवर्जून सांगते, मिताली सोबतही तिचे छान बॉंडिंग तयार झालेले आहे. सिध्दार्थ जेव्हा मितालीसोबत लग्न करतोय हे त्याने सईला सांगितले तेव्हा अगोदर सईने आश्चर्य व्यक्त केले होते. तू नक्की विचार केलायेस ना? अशी पहिली प्रतिक्रिया सईने सिद्धार्थला दिली होती.
कारण मिताली मयेकर सोबत सईने एक मालिका केली होती. त्यावेळी मिताली बालकलाकार म्हणून काम करत होती. तेव्हापासून सई मितालीला ओळखत होती. पण सिद्धार्थ तिच्या प्रेमात आहे यावर तिने सिध्दार्थला पुन्हा विचार करायला भाग पाडले होते. सिद्धार्थ आणि मिताली यांचे लव्हमॅरेज आहे. या दोघांची भेट कशी घडली आणि दोघे एकमेकांना कधी आवडू लागले याबद्दल सिध्दार्थने प्रथमच त्यांच्या या प्रेम कहाणीचा खुलासा केला आहे. या दोघांची पहिली भेट कॉमन फ्रेंड मार्फत झाली होती. पण त्यावेळी दोघेही एंगेज होते. सिद्धार्थ रसिका सुनीलला डेट करत होता तर मिताली आणखी कुणालातरी डेट करत होती. पण दोघांच्या आवडीनिवडी एकच आहेत हे त्यांना पहिल्याच भेटीत उलगडले होते. कारण सिद्धार्थ त्यावेळी नुकताच लंडनहून परतला होता आणि मिताली हॅरी पॉटरची भयंकर फॅन होती. तेव्हा सिध्दार्थने माझ्याकडे हॅरी पोर्टरच्या हार्डडिस्कमध्ये कॉपीज आहेत असे मितालीला खोटे सांगितले होते. त्या पाहण्यासाठी मिताली थेट सिध्दार्थच्या घरी गेली होती.
पण कालांतराने या दोघांची ओळख वाढत गेली. आपण हॅरी पॉटर डेट करू असे मितालीने गमतीने म्हटले होते तेव्हा ते दोघे सहज म्हणून भेटले. पण त्यानंतर सिध्दार्थला तिचा सहवास आवडू लागला होता. तिच्याशिवाय आपण कोणत्याच मुलीशी बोलू शकत नाही याची त्याला जाणीव झाली. तेव्हापासून सिद्धार्थ मितालीच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतरही या दोघांनी एकमेकांच्या आवडीनिवडी जपलेल्या पाहायला मिळतात. कारण सिद्धार्थ म्हणतो की आमच्या दोघांचं तीन जग आहेत. एक माझं जग, एक तिचं जग आणि तिसरं आमच्या दोघांचं. असं जर असेल तरच तुमचं प्रेम टिकून राहण्यास मदत होते.