सध्या सोशल मीडियावर अनेक लोक आपलं मत व्यक्त करताना पाहायला मिळतात. चांगलं काय आणि वाईट काय हे त्यांच्या कॉमेन्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत. पण हे फक्त म्हणण्यापुरतंच मर्यादित आहे हे टीआरपीच्या यादीमुळे समोर येत. झी मराठी वाहिनी गेल्या अनेक महिन्यांपासून टीआरपीच्या यादीत पाहायला मिळत नव्हती. एक नव्हे २ नव्हे तर तब्बल १० च्या १० मालिका ह्या स्टार प्रवाह वाहिनीच्याच होत्या. झी मराठीची एकही मालिका पहिल्या १० च्या यादीत पाहायला मिळत नव्हती. स्टार प्रवाहाच्या अनुक्रमे ठरलं तर मग, प्रेमाची गोष्ट, लक्ष्मीच्या पावलांनी, तुझेच मी गीत गात आहे, सुख म्हणजे नक्की काय असत, आई कुठे काय करते, कुण्या राजाची ग तू राणी, मन धागा धागा जोडते नवा, तुझेच मी गीत गात आहे, होऊ दे धिंगाणा अश्या मालिका अवलस्थानी पाहायला मिळतात.
गेल्या काही महिन्यांपासून झी मराठीची एक नवी मालिका (रिऍलिटी शो) “जाऊ बाई गावात” एक सुंदर कार्यक्रम असूनही पहिल्या १५ मालिकांमध्ये देखील त्यांना स्थान प्राप्त करता आलं नाही. गावात जाऊन गावकऱ्यांची मदत करत आपली कला आणि खेळ सादर जाणाऱ्या शहरातून गावात आलेल्या मुली खूप सुंदर संदेश देताना पाहायला मिळतात. शो मध्ये थोडी भांडण थोडा राग फुगवा पाहायला मिळाला तरी खेळ सादर करताना ह्या मुली सर्वाना सोबत घेऊन पुढे जाताना पाहायला मिळतात. गावातील लोकांनी ह्या मुलींना दिलेली साथ पाहायला देखील चांगली मज्जा येते. गावातील लोकांची मदत करत चांगला संदेश देत ह्या मुली गावकऱ्यांची मने जिंकताना पाहायला मिळतात. एक उत्तम पारिवारिक शो जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत पाहताना सर्वांच्याच चेहऱ्यावर स्मित हास्य उमटवताना दिसतो. सोशल मीडियावर देखील ह्या कार्यक्रमाचं कौतुक होताना पाहायला मिळत. पण इतकं सगळं असूनही ह्या शो चा टीआरपी पाहता मराठी माणूस कुठे हरवलाय हेच समजत नाही.
पहिल्या महिन्यात जाऊबाई गावात हा शो पहिल्या २० व्या स्थानामध्ये पाहायला मिळाला होता त्यानंतर १६ व्या क्रमांकावर देखील आपलं स्थान उंचावताना पाहायला मिळत होता. पण का कुणाचं ठाऊक पुन्हा हा शो ह्या महिन्यात २० व्या स्थानावर आलेला पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तुला शिकवीन चांगलाच धडा, सातव्या मुलीची सातवी मुलगी आणि सार काही तिच्यासाठी ह्या मालिका देखील जाऊबाई गावात शोच्या पेक्षा जास्त टीआरपी मिळवताना पाहायला मिळतोय. याचा अर्थ असाच होतोय कि मराठी माणूस घराघरातील भांडणं, एकमेकांचे पाय ओढणाऱ्या शो मधून आणि एकमेकांची लफडी पाहण्यातच आपला वेळ वाया घालवत आहे. काय चांगलं काय वाईट हे फक्त बोला पूरतेच आहे लोकांना जे पाहायचंय ते तेच पाहतात ह्याची शोकांतिका आहे. पारिवारिक मालिका ह्यामुळेच संपत चालल्या आहेत आणि त्याची जागा वाईट कृत्य, लफडी भानगडी हेच पाहण्यात मराठी माणूस गुंतलाय हेच वास्तव आहे. मराठी वाहिन्यांना तरी नाव ठेवण्यात काय अर्थ आहे आपण जे पाहतोय तेच ते दाखवत आहेत कटू आहे पण तेच सत्य आहे.