सामान्य मराठी कुटुंबाची गगनभरारी…. शिक्षण आणि मेहनतीची सांगड घालत आज अमेरिकेत असं केलं आपलं विश्व् निर्माण
मराठी माणूस कुठेच मागे नाही राहिला पाहिजे असे म्हटले जाते. मराठी माणूस शेतीउद्योगात तर वर्षानुवर्षे हुशार आहेच‧ नोकरी धंद्यातही आपल्यापरीने त्याने व्यवस्थित बस्तान बसवून ठेवलेले आहे‧ शास्त्रज्ञ, वकील, डॉक्टर, संशोधक अशा व्यवसायांमध्येसुद्धा मोठमोठ्या पदांवर मराठी माणूस जगभर नाव लौकिक करताना दिसतात‧ गेल्या काही वर्षांपासून परदेशातही मराठी नाव चमकू लागले आहे‧ अशातच एक नाव म्हणजे महेश खोत आणि शिल्पा खोत हे दाम्पत्य अमेरिकेत राहून स्वतःची एक वेगळी ओळख जपताना दिसत आहे. सामान्य घरातील महेश खोत ह्यांना इंजिनिअरिंग करायचं होत पण त्यावेळी घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन देखील घेता आलं नाही. पण आज आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी यशाचं शिखर गाठलेलं पाहायला मिळत आहे.
“ट्रॅव्हल विथ शिल्पा” या नावाने युट्युबर म्हणून ओळख मिळणाऱ्या शिल्पा खोत या अमेरिकेत राहून तिथली सर्व माहिती आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. अमेरिकेत जायचं कसं?, अमेरिकेची खाद्य संस्कृती काय आहे? , तिथली लोकं कशी आहेत?, शिक्षण पद्धती कशी आहे?. अमेरिकेत घर घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? अशी सर्व योग्य ती माहिती शिल्पा तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. शिल्पा खोत या मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या. संभाजीनगरमध्ये राहूनच त्यांनी आपले पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी बारामती आणि पुण्यात बीएड, एमएड केलं. शिल्पाचे पती महेश खोत हे मूळचे कऱ्हाडचे पण त्यांचे संपूर्ण शिक्षण त्यांनी पुण्यातून केलं. कंप्युटर सायन्सचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातील पटनी कंपनीत काम केलं. पुढे ह्याच कंपनीने त्यांना अमेरिकेत पाठवलं आणि इथूनच त्यांचा जीवनाला नवी दिशा मिळाली. २००५ सालापासून महेश खोत अमेरिकेत कार्यरत आहे. दरवेळी आपल्या कामात काहीतरी नवीन शिकण्याचा छंदच त्यांना लागलेला असतो त्याची हि उत्सुकताच त्यांच्या यशाचं खरं कारण असल्याचं दिसून येत. सध्या मॅनेजर म्हणून ते तिथली जबाबदारी सांभाळत आहेत. शिल्पा आणि महेशचं अरेंज मॅरेज होतं. महेशच्या आईवडिलांनी शिल्पाला सून म्हणून पसंती दिली होती त्यानंतर काही दिवसांनी रजा काढून महेश भारतात आले.
अवघ्या महिन्याभारतच त्यांच्या लग्नाचा बार उडाल्यानंतर हे दोघेही अमेरिकेला रवाना झाले. सुरुवातीला अमेरिकेत राहून शिल्पाने तिथल्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली होती. कोरोना काळात शाळेच्या काही अटी मान्य करता येणार नसल्याने तिने तिच्या नोकरीला रामराम ठोकला. अमेरिकेत राहून स्वतःचे घर पाहण्याचे स्वप्न या दाम्पत्याने पाहिले होते. तेव्हा शिकागो मध्ये त्यांनी पहिलं घर खरेदी केलं पण तिथले हवामान सूट न झाल्याने त्यांनी ते घर विकायला काढले. त्यानंतर ह्यूस्टन टेक्सासला स्वतःचे दुसरे आलिशान घर खरेदी केले. शिल्पा स्वतःचा युट्युब चॅनल चालवते. त्यात ती महत्वपूर्ण माहिती देणारे अनेक व्हिडिओ बनवते. विशेष म्हणजे हि मंडळी भारताबाहेर राहत असली तरी भारतात जसे सॅन उत्सव साजरे करतात तसेच तेथेही होळी, दिवाळी, गणपती इतकाच नाही तर शिवजयंती देखील जल्लोषात साजरी करतात. तिच्या या व्हिडिओला लाखोंचे हिट्स मिळतात. त्यामुळे शिल्पा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. काही दिवसांपूर्वी महेशने टेसला कार घेतली. टेस्ला कारची संपूर्ण माहिती शिल्पाने मराठीतून सांगिलेली पाहायला मिळते टेसला कारची माहिती मराठीतून सांगणारी शिल्पा पहिली मराठी युटूबर असावी अर्थात ती त्यांची स्वतःची कार असल्याने हे शक्य झाले. मराठी कुटुंबाकडे असलेली हि आलिशान टेसला कार पाहून अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या. शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या खोत कुटुंबाचं त्यांचे चाहते नेहमीच कौतुक करत असतात. त्यामुळे अनेकांसमोर त्यांनी एक आदर्श घडवून दिला आहे.