आम्हीच हा वर्डकप जिंकणार म्हणणाऱ्या पाकिस्तान संघावर आली हि वेळ … अफगाणिस्तानने देखील सफशेल लोळवळ
आज सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ रोजी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात विश्व चषक सामान्य चिदंबरम स्टेडिअमवर पार पडला. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेत अफगाणिस्तान समोर २८३ धावांचा लक्ष ठेवलं. अफगाणिस्तानने ह्या धावांचा पाठलाग करत फक्त २ विकेट गमावत पाकिस्तानचा धुवा उडवला. कोणालाही पाकिस्तान संघाला अफगाणिस्तान हरवेल अशी अपेक्षा नव्हती. पण अफगाणिस्तानने चांगली खेळी करत हा सामना ४९ व्या ओव्हररमध्ये जिंकला. रेहनुल्ला गुरबाझ याने ६५ धावा, इब्राहिम जब्रान याने ८७ धावा, रेहमात शाह बिनबाद ७७ धावा आणि हसमदुल्लाह शाहिदी नाबाद ४८ धावा करत हा सामना जिंकला.
आम्हाला बीफ हवं, त्यांनतर बिर्याणी हवी आणि आमच्या लोकांना व्हिजा हवा अशी मागणी करणारा पाकिस्तान संघ आता सफशेल धूळ चाटताना पाहायला मिळत आहे. सतत काहींना काही कमी काढत आणि सतत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धडपडणारा संघ मात्र क्रिकेटच्या सामन्यात आपला खेळ दाखवू शकला नाही. सुरवातीला आम्हीच ह्या चषकाचे प्रमुख दावेदार म्हणणारा हा संघ आता कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचा देखील राहिला नाही. साधारण टीम सोबत सामने जिंकून सतत चर्चेत राहणार हा संघ २०२३ चषकातून बाहेर पडलेला पाहायला मिळत आहे. पाकिस्तानने आत्तापर्यंत ५ सामने खेळून फक्त २ सामन्यात आपला विजय कसाबसा प्रस्तापित करताना पाहायला मिळत होता. पण आजच्या सामन्यामुळे आता पुढील सर्व सामने जिंकून देखील पाकिस्तान संघ जवळजवळ बाहेरच पडला आहे. पुढील सामने २७ ऑक्टोबर साऊथ आफ्रिके सोबत, ३१ ऑक्टोबर बांगलादेश, ४ नोव्हेंबर न्यू झीलंड सोबत आणि ११ नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया सोबत पाकिस्तान संघाचे सामने होणार आहेत. ह्या सर्व टीम झीप स्ट्रॉंग असल्याने पाकिस्तान बाहेर जाणार हे जवळ जवळ निश्चित झालं आहे.