मराठी इंडस्ट्रीत सातत्याने काम मिळावे यासाठी खूप प्रयत्न करावे लागत असतात. काही ठराविक कलाकारांना ही संधी नेहमी मिळत असते पण काही कलाकार मात्र या इंडस्ट्रीत असूनही नसल्यासारखे असतात. इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी तुम्हाला कायम एकमेकांच्या संपर्कात राहणे गरजेचे असते तर काही वेळेला सोशल मीडियावर तुम्ही सक्रिय राहणे आवश्यक असते. पण एवढं सगळं करूनही तुम्ही काम मिळवण्यासाठी धडपडत असता तेव्हा तुमची कोणीतरी दखल घेणे आवश्यक असते असे होत नसल्यामुळेच कलाकारांना काम मिळवण्यासाठी एक प्रयत्न म्हणून सविस्तर पोस्ट लिहावी लागते. नुकतेच अभिनेता श्रीकर पित्रे याने देखील सोशल मीडियावर काम मिळवण्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे.
त्यात तो म्हणतो “नमस्कार खूप दिवस झाले इथे पोस्ट टाकावी का नको ह्या संब्रह्मात होतो.पण म्हणलं एक प्रामाणिक प्रयत्न करून बघुया.कामं शोधण्याचे अनेक प्रयत्न झाले.. मला अभिनय करायचा आहे, आणि मी चांगल्या कामाच्या शोधात आहे. कोणाकडे माझ्यासाठी काही चांगला रोल असल्यास कृपया मला संपर्क साधावा. धन्यवाद “. असे म्हणत श्रीकरने सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीकर पित्रे काही दिवसांपूर्वी रविंद्र महाजनी यांच्या अंत्यसंस्कारावेळी हजेरी लावताना दिसला. गश्मीर महाजनी याचा तो खास मित्र आहे. गश्मीरच्या संगण्यावरूनच तो रविंद्र महाजनी यांना पाहण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे गेला होता. त्यावेळी श्रीकर होता ज्याने माझी या कठीण काळात खूप मदत केली असे गश्मीर म्हणाला होता. श्रीकर पित्रे हा पुण्यातच वास्तव्याला आहे. अभिनव शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्याने काळेवाडी येथील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजमधून शिक्षण घेतले. पुढे अभिनयाची आवड असल्याने त्याने मुंबई गाठली.
नाटकातून छोट्या छोट्या भूमिका करत त्याने जाहिरात क्षेत्रातही काम करण्यास सुरुवात केली. लव्ह लग्न लोचा, तू फुलराणी, चित्रकथी, भाऊबली, ईश्क वाला लव्ह मध्ये त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. पूर्वा सारस्वत या मैत्रिणीसोबत श्रीकरने लग्नगाठ बांधली. लव्ह गेली अनेक वर्षे श्रीकर छोट्या पडद्यापासून काहीसा दूर आहे. २०२२ सालच्या भाऊबळी चित्रपटात तो शेवटचा पाहायला मिळाला. त्यानंतर त्याच्याकडे कुठलेच काम आले नाही. श्रीकर आता चांगल्या कामाच्या शोधात आहे त्याच्या या पोस्टमुळे त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे त्याच्या या पोस्टची लवकरच दखल घेतली जाईल याची शाश्वती आहे. श्रीकर पित्रे अगोदर अभिनेता आस्ताद काळे यानेही काम नसल्याचे पोस्टद्वारे सांगितले होते त्यानंतर तो जाऊ नको दूर बाबा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.