अभिनेता उमेश कामत याने आजवर अनेक मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. प्रिया बापट आणि उमेश कामत हे सेलिब्रिटी कपल प्रेक्षकांचं आवडतं कपल आहे. काही वर्षांपूर्वी अजूनही बरसात आहे या मालिकेत तो मुख्य भूमिकेत दिसला होता. त्यानंतर तो जर तरची गोष्ट, माय लेक, येरे येरे पैसा३ अशा नाटक, चित्रपटात झळकला. या सर्व कामातून निवांत वेळ घालवता यावा यासाठी उमेश कामतने महाराष्ट्र प्रवास सुरू केला आहे. पण त्यासाठी त्याला बाईकची गरज होती. म्हणून नुकतीच त्याने त्याची ड्रीम बाईक खरेदी केली आहे. Triumph scrambler 400 X ही बाईक उमेशने काल खरेदी केली.
या बाईकची किंमत ३ लाख १४ हजार इतकी आहे. आता ही बाईक घेऊन उमेश कामत त्याच्या सेलिब्रिटी मित्रांसह महाराष्ट्र फिरण्यासाठी सज्ज झाला आहे. अजूनही बरसात आहे या मालिकेत काम करत असताना अभिनेता संकेत कोर्लेकर आणि मिहीर राजदासोबत त्याची छान मैत्री झाली होती. संकेतला बाईक रायडिंगची आवड आहे, त्यामुळे हे त्रिकुट बाईक रायडिंग करताना दिसले तेव्हा उमेशलाही अशी आवड असल्याचे संकेतच्या लक्षात आले. त्यामुळे आता तब्बल अडीच वर्षाने का होईना उमेशने बाईक खरेदी केल्याचे पाहून संकेत खुश झाला आहे.
त्यामुळे आता या नव्या कोऱ्या बाईकने उमेशला महाराष्ट्र फिरायचा आहे. उमेश कामत, संकेत कोर्लेकर आणि मिहीर राजदा हे तिघेही महाराष्ट्र फिरण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांचा हा दौरा नुकताच सुरू झाला असून त्यासाठी सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा देऊ केल्या आहेत. आता त्यांचा हा दौरा किती दिवसांत पूर्ण होतोय याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. तूर्तास उमेशला या नवीन खरेदीसाठी आणि प्रवासासाठी शुभेच्छा!.