गिरीजा प्रभू सोबत झळकणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा आला समोर…यशच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध अभिनेता

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका संपल्यानंतर आता गिरीजा प्रभू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोण होतीस तू काय झालीस तू ही नवी मालिका येत्या २८ एप्रिल पासून रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे. मालिकेचा दुसरा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेत अभिनेते वैभव मांगले, अमित खेडेकर, अमृता माळवदकर हे कलाकार झळकणार असे त्यात दिसले होते. पण आता या कलाकारांची यादी वाढलेली पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने, साक्षी गांधी, भाग्यश्री पवार हेही कलाकार दिसणार आहेत. तर मुख्य नायकाच्या भूमिकेत पुन्हा एकदा अभिनेता मंदार जाधव दिसणार आहे. मंदार जाधव याने सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत गिरीजा प्रभू सोबत स्क्रीन शेअर केली होती. पण आता हीच जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने अनेकांनी दोघांचं स्वागत केलं आहे.

दरम्यान यशच्या मुख्य भूमिकेत अगोदर सिद्धार्थ चांदेकर झळकणार असे बोलले जात होते. पण आता यावरचा पडदा हटला असून मंदारला पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीने एक संधी देऊ केली आहे. आता मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोत सुकन्या कुलकर्णी या यशच्या आईची भूमिका साकारत आहे आणि ही भूमिका नकारात्मक वाटत आहे. त्यामुळे सुकन्या कुलकर्णी अशा भूमिकेत पाहून प्रेक्षकांना जड जाणार की त्यांची भूमिका स्वीकारणार हे लवकरच स्पष्ट होईल.