
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला. या सकजरपुड्याचे खास क्षण सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळाले. पुण्यात हा आलिशान सोहळा पार पडला त्यावेळी पवार कुटुंब एकत्रित जमलेले पाहायला मिळाले. दरम्यान अजित पवार यांचा थोरला मुलगा पार्थ पवार कधी लग्न करणार? अशीही विचारणा करण्यात आली तेव्हा अजित पवार यांनी मोजक्या शब्दात उत्तर देताना म्हटले की, ‘जयने ठरवलं त्याने ते केलं, पार्थ जेव्हा ठरवेल तेव्हा होईल.’ असे म्हणत अजित पवार यांनी मीडियाची बोलती बंद केली.

दरम्यान पवार कुटुंबाची होणारी सून ऋतुजा पाटील नक्की आहेत तरी कोण ? असे प्रश्न निर्माण झाले. ऋतुजा पाटील ही प्रसिद्ध उद्योगपती प्रवीण पाटील यांची लेक आहे. प्रवीण पाटील यांची सोशल मीडिया कंपनी आहे. साताऱ्यातील फलटण शहरात ते वास्तव्यास आहेत. ऋतुजा पाटील उच्च शिक्षित आहे. तर तिची बहीण केसरी टूर्सचे मालक केसरी पाटील यांची सून आहे. काही दिवसांपूर्वीच केसरी पाटील यांचे निधन झाले होते.

अजित पवार यांचा मुलगा जय पवार याने अजून राजकारणात प्रवेश केलेला नाही. पण आई आणि वडिलांसाठी त्याने प्रचाराचे काम हाती घेतले होते. पार्थ पवार याने मावळमधून निवडणूक लढवली होती. पण पहिल्याच फटक्यात राजकारणात तो अयशस्वी ठरला.