लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर दोन नव्या मालिका दाखल होत आहेत . त्यामुळे स्टार प्रवाहवरील काही मालिका एक्झिट घेत आहेत तर काही मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. टीआरपी खाली आला असेल तर त्या मालिकेला दुपारच्या वेळेत प्रसारित करण्यात येते. आई कुठे काय करते या मालिकेच्या बाबतीतही असेच काहीसे पाहायला मिळाले. पण आता सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या बाबतीत वाहिनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका गेल्या साडे ३ वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काहीच महिन्यांपूर्वी या मालिकेने तब्बल २५ वर्षांचा लिप घेतला होता. गौरी आणि जयदीप यांचा पुनर्जन्म त्यात पाहायला मिळाला.
नित्या आणि अधिराज दोघेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता या दोघांच्या लग्नाची घाई मालिकेत सुरू आहे. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत ६ व्या क्रमांकावर पसंती मिळवत आहे. पण आता नवीन मालिकेच्या एंट्रीमुळे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या वेळेत बदला घडून येणार आहे. रात्री १० वाजता प्रसारित होत असलेली ही मालिका आता रात्री ११ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण वाहिनीने घेतलेल्या या निर्णयावर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे. नित्या आणि अधिराज ही जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेला चांगला टीआरपी मिळत असताना तिची प्रसारणाची वेळ का बदलली जाते असा प्रश्न नाराज प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे. आहे त्या वेळेतच मालिका प्रसारित व्हावी अशी मागणी केली जात आहे.
त्यामुळे वाहिनीला आपला निर्णय बदलावा लागणार का हे पाहावे लागेल. कारण प्रेक्षकांनी ठरवले तर रटाळ मालिकेला त्यांनी डच्चू दिलेला आहे तर चांगल्या मालिका वर्षानुवर्षे चालू ठेवल्या आहेत. त्यामुळे आता वाहिनीला प्रेक्षकांचे ऐकावे लागणार की ते आपल्या निर्णयावर ठाम असणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.