news

सेलिब्रिटी कपलने खरेदी केली नवीन गाडी… वाढदिवसानिमित्त पत्नीला दिली गाडी गिफ्ट

मराठी मालिकांमधून काम करून कलाकारांची चांगली कमाई सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी हक्काचं घर आणि गाडी खरेदी करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांत सेलिब्रिटींच्या बाबतीत अशा गोष्टी समोर येत आहेत. अशातच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील सेलिब्रिटी कपलने आणखी एक गाडी खरेदी करण्याचा आनंद साजरा केला आहे. आज ६ ऑक्टोबर अभिनेत्री श्वेता मेहेंदळे हिचा वाढदिवस. वाढदिवसाच्या दिवशी गाडी खरेदी करून राहुलने तिला बर्थडे गिफ्ट दिलं आहे. राहुल मेहेंदळे आणि श्वेता मेहेंदळे हे सेलिब्रिटी कपल गेली अनेक वर्षे या इंडस्ट्रीत काम करत आहे. अनेक चढउतार सहन करत दोघांनी मेहनतीने स्वतःची ओळख जपली आहे.

rahul mehendale and shweta mehendale car
rahul mehendale and shweta mehendale car

सध्या दोघेही सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत भूमिका साकारत आहेत. आज श्वेतासाठी राहुलने Maruti alto k10 ही जवळपास ६ लाखांची गाडी खरेदी करून तिला वाढदिवाचे सरप्राईज दिले आहे. त्यामुळे श्वेताचा हा वाढदिवस तिच्यासाठी खूपच खास ठरला आहे. आभाळमाया, जावई बापू जिंदाबाद, माझ्या नवऱ्याची बायको, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला अशा चित्रपट, मालिकांमधून श्वेताने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता राहुलने बोक्या सातबंडे, बोलाची कधी बोलाचा भात, ऊन पाऊस, अवंतिका, सुहासीन, बेधुंद मनाच्या लहरी अशा अनेक मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. एका जाहिरातीसाठी विनय आपटे यांच्याकडे काम करत असताना काही मॉडेल्स हव्या होत्या.

तेव्हा श्वेताला या ऍडफिल्म बद्दल विचारलं तेव्हा श्वेताने हो म्हटलं. पुढे एकमेकांसोबत काम करत असताना तिला राहुल आवडू लागला. बोक्या सातबंडे मधील राहुलचं काम तिला आवडत होतं. एकमेकांना दोघेही आवडत असताना राहुलने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. आणि २००३ साली घरच्यांच्या संमतीने दोघांनी थाटात लग्न केले. मध्यंतरी ब्रेनस्ट्रोकमुळे राहुल मेहेंदळेची वाचा गेली होती. डॉक्टरांच्या योग्य उपचारानंतर त्यांचा आवाज पुन्हा आला यात श्वेताची मोठी साथ त्याला मिळाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button