news

तू भेटशी नव्याने या मालिकेतील अभिनेत्रीने नुकताच साखरपुडा… तिच्या डान्स परफॉर्मन्सने सोहळ्याला अधिक रंगत चढली

सोनी मराठी वरील तू भेटशी नव्याने या मालिकेतील अभिनेत्रीने नुकताच साखरपुडा केला आहे. मालिकेत नायिकेची मैत्रीण अन्नूची भूमिका अभिनेत्री निकिता घाग हिने साकारलेली पाहायला मिळते. तू भेटशी नव्याने या मालिकेतून निकिताला अभिनयाची मोठी संधी मिळाली आहे. ठाण्यातील ज्ञान साधना कॉलेजमध्ये असताना निकीताने नाटकातून सहभाग दर्शवला. नाट्यस्पर्धा, एकांकिकेतून निकिताला उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिकं मिळाली आहेत. फ्लाईंग राणी या नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला झी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

nikita ghag and yuvraj singasane wedding
nikita ghag and yuvraj singasane wedding

गाथा नवनाथांची, राणी मी होणार अशा मालिकेतून निकीताने छोट्या मोठया भूमिका साकारलेल्या आहेत. अशातच आता निकीताने युवराज सिंगासने सोबत साखरपुडा करून आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. निकिता आणि युवराज यांच्या साखरपुड्याला जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. साखरपुड्यावेळी निकीताने होणार सून मी ह्या घरची…गाण्यावर डान्स केला तिच्या या डान्स परफॉर्मन्सने सोहळ्याला अधिक रंगत चढली. निकिता घाग आणि युवराज सिंगासने दोघांचेही साखरपुड्यानिमित्त अभिनंदन !.

nikita ghag and yuvraj singasane wedding engagement photo
nikita ghag and yuvraj singasane wedding engagement photo

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button