अमेरिकन युट्युबर Mrbeast उर्फ जेम्स स्टीफन (जिमी) नुकताच भारत भेटीला आला आहे. युट्युबर जेम्सचे ३२ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. सामान्य जनतेप्रमाणे बॉलिवूडचे कलाकारही त्याचे चाहते आहेत. याचमुळे काल मुंबईत पार पडलेल्या एका सोहळ्यात मिस्टर बिस्टला भेटण्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. तेव्हा मिस्टर बिस्टसमोर बॉलिवूड देखील नतमस्तक होतंय की काय अशी चर्चा येथे पाहायला मिळाली. कारण या सोहळ्यात चक्क नवाबालाच नतमस्तक व्हावंसं वाटलं अशी टीका करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर सैफ अली खान आणि मिस्टर बिस्टच्या या भेटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सैफअली खानलाच ट्रोल केलं आहे. मिस्टर बिस्टला भेटण्यासाठी सैफ अली खान त्याच्या दोन्ही मुलांना घेऊन स्टेजवर पोहोचतो. पण सैफला बिस्टने ओळखलेच नसल्याने त्याने स्टेजवरून मुलांसह त्यांना खाली उतरण्यास सांगितलं. व्हिडीओमध्ये सैफ बिस्टसोबत बोलतानाही दिसतो. मी कोण आहे याची तो खात्री करून देतो. तेव्हा त्यानंतर बिस्ट सैफ सोबत फोटो काढायला स्माईल देतो. फोटो काढून झाल्यानंतर सैफ त्याच्या मुलांसह खाली उतरतो. दरम्यान हा व्हिडीओ नेटकऱ्यांमद्धे चर्चेचा विषय ठरला आहे. जिथे पापाराजीला सैफ कित्येकदा हटकताना दिसला होता
पापाराजीची वार्ताहर मंडळी या सेलिब्रिटींची झलक मिळवण्यासाठी त्यांच्या मागे मागे फिरत असतात. तेव्हा सैफ अली खान एकदा या वार्ताहराना ‘आता आमच्या बेडरूमपर्यंत येणार का?’ असे म्हणत त्यांना हिनवत असतो. आणि आता हाच सैफ अमेरिकन युट्युबरसोबत फोटो काढताना त्याच्या पुढे पुढे करताना स्वतःची ओळख त्याला दाखवावी लागत आहे. हा अनुभव सैफला देखील घ्यावा लागल्याने त्याची या युट्युबरने जिरवली अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून मिळत आहे.