“कालची पोरगी माझ्या रूममध्ये? चालणार नाही” मेकपरूम मधून बाहेर काढल्यावर उषा नाईक रडत …मोहन गोखले यांचा आठवणीतला किस्सा
आज ७ नोव्हेंबर दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांचा जन्मदिवस. मोहन गोखले यांनी नायक म्हणून मराठी सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला. पण हे राम चित्रपटावेळी त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. एक देखणा, तरुण , हरहुन्नरी नायक मराठी सृष्टीने गमावल्याची खंत त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती. मोहन गोखले यांच्या सोबत अनेक कलाकारांनी काम केलं होतं. सहकलाकारांना सांभाळून घेणं अशी ही मोठी मंडळी करत असत. एकदा चित्रपटाच्या शूटिंगवेळी उषा नाईक झाडाखाली रडत बसल्या हे पाहून मोहन गोखले यांनी त्यांची विचारपूस केली. या घटनेचा किस्सा त्यांची पत्नी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी शेअर केला आहे. याबद्दल त्या म्हणतात की, तारीख,महिना,वर्षं या सगळ्या भूतलावरच्या गोष्टी ७ नोव्हेंबर। मोहनचा वाढदिवस… त्याच्या आत्ताच्या दूरच्या गावी नोव्हेंबरची ७ तारीखबिरीख नसेलही…🦋.. पण एक चक्कर मारून गेला बहुधा! कारण नोव्हेंबर मध्ये मी एक टेलिफ़िल्म केली, न् सध्या एका आगामी प्रोजेक्टवर काम चालू आहे..गाठीभेटी इ. टेलिफिल्म मध्ये उषाताई होत्या.. उषा नाईक.
मोहनच्या पहिल्या पिक्चरची हिरॉईन🙂बन्याबापू! सुपरहिट सिनेमा.. गाणी त्याहून सुपरहिट! खूप गप्पा,आठवणी. उषाताईंनी सांगीतलं त्या पिक्चरच्या शूटींगचा पहिला दिवस. कोल्हापुरातला स्टुडिओ. दोन जोड्या होत्या.एक मेकपरूम हिरॉईन्सची एक मेकपरूम हिरोंची.. बाळकाका( कर्वे) न् मोहनराव( गोखले) स्टुडिओचा फेरफटका मारत होते..त्यांना झाडाखाली आपलं सामान घेऊन मुसमुसत बसलेल्या उषाताई दिसल्या.. त्यांना दुसर्या हिरॉईननी मेकपरूम मधून बाहेर काढलं होतं. “ कालची पोरगी माझ्या रूममध्ये? चालणार नाही”असं म्हणून🙃 उषाताई म्हणाल्या”मोहननी त्याक्षणी माझी bag उचलून त्यांच्या रूम मध्ये नेलं.. तू इथे कर तुझा मेकप वगैरे..तुला costume change असेल तेंव्हा आम्ही जाऊ बाहेर” “ते पिक्चर पूर्ण होईपर्यंत मला त्यांची रूम दिली बघ” 🥹 गेला आठवडाभर एका कामाची पूर्वतयारी चालू आहे, नीनाताई (कुळकर्णी)बरोबर! ”सावित्री” नाटकाच्या आठवणी निघाल्या..मोहनचं काम.. इतर काम याबद्दल फार प्रेमानी बोलत होती नीना ताई🌼 पण एक आठवण मला त्यात काम केलेल्या अमिता खोपकरनी सांगीतलीये..🤡 तेंव्हाचे दौरे मोठे आणि बाकीच्या सोयी म्हणजे नावालाच सोयी.. गावातलं सगळ्यात कळकट, गैरसोयींचं लॉज असायचं..😐 अशाच एका दौ-यात कुठल्यातरी आडगांवात ही मंडळी पहाटे लॉजला पोंचली..
कधीही कोसळून पडेल असं ते लॉज होतं अर्धवट झोपेत, manager नी नेमून दिलेल्या रूमच्या किल्ल्या घेण्यासाठी ताटकळलेले सगळे.. मोहन एक किल्ली उचलून भराभर जिना चढून गेला.. आणि वरून जोरात वेटरला हाका मारून म्हणे” अरे इथला AC आणि TV चा रिमोट दे बघू, कार्पेट ओलं झालंय ते बदल जरा” बायकांमध्ये जो काही खडबडाट झाला😅” त्याला सुपर डीलक्स “दिलीय 🤔🤯खूप गदारोळ झाला.. manager एकीकडे त्यांना शांत करत होता न् मोठ्यानी वरच्या मजल्यावरच्या मोहनला” गप ना मोहन्या, xxxxxx! ओरडत होता!!! त्या लॉजला धड दारही नव्हतं..तिथे हे सगळं का असेल🤣😅 असा छळायचा मोहन-इति अमिता.. तर आपण काही करायचं नाही आठवणी आपोआप तरंगत आसपास येतातच!!!