एकेकाळी रस्त्यावर भजी आणि चहा विकायचा हा दिग्गज कलाकार… एकदा सेटवर चहा देताना असं काही घडलं कि
आज हिंदी चित्रपट सृष्टीतील विनोदी आणि चारित्र्य कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठमोळे अभिनेते “धुमाळ” यांच्याबद्दल जाणून घेऊयात… त्यांचे संपूर्ण नाव अनिल बलवंत धुमाळ. २९ मार्च १९१४ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वकील होते परंतु वयाच्या १० वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घरची सर्व जबाबदारी अनिल यांच्यावरच येऊन पडली. त्याकाळी ब्राह्मणांच्या दारात गेल्यावर मोकळ्या हाती कोणी परत येत नसे त्यामुळे पोटाची खळगी भरण्यास हातभार लागत असे. त्यानंतर त्यांनी नाटक कंपनीत छोटी मोठी कामे मिळवली. इथे ड्रिंक सर्व्ह करणे, भांडी धुणे तर कधी स्पॉट बॉय म्हणूनही मिळेल ती कामे त्यांनी स्वीकारली. यातूनच कधीकधी नाटकांतून छोट्या भूमिका करण्याची संधी मिळाली.
त्यावेळी पी के अत्रे आणि नानासाहेब फाटक या नाट्य क्षेत्रातील दिगगजांशी ओळख झाली आणि इथूनच त्यांच्या कारकिर्दीला खरी सुरुवात मिळाली. मराठी नाटक आणि चित्रपट सृष्टीप्रमाणेच त्यांनी हिंदी चित्रपटांतून विनोदी भूमिका गाजवून आपल्या सजग अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ४० ते ८० च्या दशकात त्यांनी आयत्या बिळावर नागोबा, खानदान, अंजाम, बेशरम, कश्मीर की कली, गुमनाम, आरजू, लव्ह इन टोकियो, देवता, हावडा ब्रिज सारखे अनेक मराठी हिंदी चित्रपट गाजवले. लग्नाची बेडी, घराबाहेर या मराठी नाटकांतून त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. शुभा खोटे, मेहमूद यांच्यासोबत चित्रपटांतून त्यांची छान केमिस्ट्री जुळून आली होती. आपल्याला शिकता आले नाही म्हणून लग्न झाल्यावर त्यांनी आपल्या पत्नीलाही शिक्षणासाठी प्रवृत्त केले. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली (त्यापैकी हेमा धनंजय फाटक ही त्यांची मुलगी). आपल्या मुलांनीही चांगले शिकावे म्हणून ते नेहमी त्यांना प्रोत्साहन देत.
त्यावेळी त्यांचे कुटुंब चेंबूरला स्थायिक होते. मुंबई ते चेंबूर या प्रवास त्यावेळी खूप बिकट होता. घरी फोन नसल्याने अनेक निर्मात्यांना धुमाळ यांनी आपल्या चित्रपटात काम करावे म्हणून त्यांच्या घरी जावे लागत असे. या कारणामुळे बहुतेक चांगल्या भूमिकांपासून ते वंचित देखील राहिले. परंतु काम मिळावे म्हणून कोणापुढे हात पसरले नाही. त्यातील बहुतेक राज खोसला, बप्पी सोनी, प्रमोद चक्रवर्ती आणि मराठीतील कमलाकर तोरणे, वसंत जोगळेकर यांच्या चित्रपटात ते नेहमीच काम करत. डायबेटीस असल्याने धुमाळ यांच्या एका डोळ्याची नजर धूसर झाली होती. त्यामुळे शूटिंगसाठी प्रवास करणे त्यांना थोडेसे कठीण होत होते. परंतु तरी देखील त्यांना कोणावर विसंबून राहणे पसंत नव्हते. अगदी स्वतःची कामे ते नेहमीच स्वबळावर पूर्ण करत. आपल्या कठीण दिवसातही त्यांनी कधी कोणापुढे हात पसरले नाहीत. सेटवर चहा देताना नाटकातील काम करणारी काही लोक आले नसल्याने नाईलाजाने त्यांना नाटकांत काम करावं लागलं आणि त्यातच ते पारंगत झाले त्यातच त्यांना यश मिळाले.
त्यांना पार्ट्यांमध्येही जायला फारसे आवडत नसे अगदीच जेव्हा सेलिब्रिटींकडून लग्नाचे आमंत्रण मिळत असे त्यावेळी ते फक्त शुभेच्छा देऊन परत येत असत. यावेळी तिथे कमीत कमी चांगले जेवण जेवायला मिळेल अशी एक भाबडी अपेक्षा त्यांच्या मुलांची असायची, परंतु यावेळी ते आपल्या मुलांना छान समजावून सांगत. आपली थोडीफार मिळवलेली सर्व संपत्ती त्यांनी लोणावळा येथे घर घेण्यासाठी वापरली होती. आपला साधेपणा त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत तसाच जपून ठेवला होता. १३ फेब्रुवारी १९८७ रोजी या हरहुन्नरी कलाकाराने अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शकांना या कलाकाराने दखल घ्यायला लावण्यास भाग पाडले होते.