
अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि कृष्णा महाडिक यांच्या एकत्रित फोटोवरून कालपासून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे. हे दोघेही महालक्ष्मी मंदिरासमोर एकत्र फोटो काढताना दिसले. कृष्णा महाडिक यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच दोघे लग्न करतायेत का? अशी एकच चर्चा पाहायला मिळाली. कृष्णा महाडिक हे खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे सुपुत्र. कोल्हापूरच्या राजकिय वर्तुळात धनंजय महाडिक यांचं मोठं नाव आहे. कृष्णा महाडिक युट्युबर असून तो रोजच्या कौटुंबिक घडामोडी त्यावर शेअर करत असतो.

त्यानेच रिंकू राजगुरू सोबतचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण या फोटोवरून दोघेही लवकरच लग्न करणार का असे बोलले जाऊ लागले. सोशल मीडियावर तर ही एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पण आता रिंकू राजगुरू हिनेही एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रिंकू राजगुरू हिने एक कपाळाला लावलेल्या हळदी कुंकवाचा फोटो शेअर केला आहे. कृष्णा महाडिक सोबत काढलेल्या त्या फोटोमध्येही कृष्णाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा असलेला पाहायला मिळाला.

यावरून रिंकू राजगुरुने लग्न ठरल्याचा एक सूचक ईशारा तर दिला नाही ना? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. हे दोघे खरंच लग्न करणार का? अशी एकच चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सध्या या चर्चेवर दोघेही मौन बाळगून आहेत. दोघांनी अजून कुठलीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे दिसून येते. मात्र चाहत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर दोघांकडून लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.