अवधूत गुप्तेनं खरेदी केलं तब्बल ७ कोटींच घर… मुंबई खार पश्चिम मधील मधील आलिशान प्रोजेक्टमध्ये लवकरच होणार शिफ्ट
मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आता कोट्यवधी किंमतीची घरं खरेदी करताना दिसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने मुंबईत 3 बीएचके फ्लॅट खरेदी केला तर अविनाश नारकर यांनीही पुण्यात1 बीएचके फ्लॅट घरेदी करत आनंदाची बातमी शेअर केली. यात आता गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यानेही मजल मारलेली पहायला मिळत आहे. नुकतेच अवधूत गुप्तेने मुंबईतील खार पश्चिम येथे नवीन घर खरेदी केलं आहे. या घराची किंमत तब्बल ७ कोटी ७५ लाख रुपये इतकी असल्याचे बोलले जाते.
खार पश्चिम मधील विठ्ठलभाई पटेल मार्गावरील रुस्तमजी पॅरामाऊंट या गृहसंकुलात त्याने हे मोठं घर खरेदी केलं आहे. जवळपास १३०० चौरस फूट इतकं या घराचं क्षेत्रफळ आहे. यात तीन गाड्यांच्या पार्किंगची देखील सोय असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात अवधूत गुप्तेने या घराचा व्यवहार पूर्ण केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या अवधूत गुप्ते बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच असलेल्या घरात कुटुंबासह राहतो. तर पुण्यातही त्याचे एक मोठे फार्महाऊस आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील जयतपाड या गावात त्याचं मोठं फार्म हाऊस आहे.
गेल्या काही वर्षात अवधूत गुप्तेने मराठी सृष्टीत चांगली प्रगती केली आहे. शोचे सूत्रसंचालन असो, परीक्षण असो किंवा गाण्याचे संगीतकार म्हणून असो त्याने या क्षेत्रात चांगलं नाव कमावलं आहे. आणि म्हणूनच खार सारख्या ठिकाणी तो तब्बल ७ कोटीचं घर खरेदी करू शकला आहे. मराठी इंडस्ट्रीत सध्या तरी एवढी मोठी रक्कम मोजून घर खरेदी करणारा हा पहिला कलाकार असावा असं म्हटलं जातं.