मला १० वी पर्यंत मराठी भाषा शिकायला होती इंग्रजी विषयापेक्षा… ‘ओळखलंत का सर मला.. ‘ विकी कौशलने म्हटली मराठी कविता

काल मराठी भाषा निमित्त राज ठाकरे यांनी शिवजीपार्क येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अशोक सराफ, आशा भोसले, जावेद अख्तर, सोनाली बेंद्रे, विकी कौशल या कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विकी कौशलने उपस्थितांशी मराठीतूनच संवाद साधला. “मला १० वी पर्यंत मराठी भाषा शिकायला होती . इंग्रजी विषयापेक्षा मला मराठीत जास्त मार्क मिळाले होते. ” असं विकी कौशल या कार्यक्रमावेळी म्हणाला. या कार्यक्रमात तो मराठीतून कविता सादर करणार हे जेव्हा आशा भोसले यांना कळलं तेव्हा त्यांनी थोडंस आश्चर्य व्यक्त केलं.
कुसुमाग्रज यांची ‘कणा’ ही कविता विकी कौशलने सादर केली. पण सुरुवातीला आपल्याला एक कविता सादर करायची हे जेव्हा राज ठाकरे यांनी सांगितलं तेव्हा ‘कणाचा अर्थ काय असतो? ‘ असा त्याला प्रश्न पडला. ‘कणा म्हणजे spine’ हे जेव्हा राज ठाकरे यांनी त्याला सांगितलं तेव्हा छावा चित्रपटामुळे आपल्याला या नावाचा अर्थ खूप चांगला समजला अशी तो प्रामाणिकपणे कबुली देताना दिसतो. अमराठी असून मला या कार्यक्रमात बोलावलं यासाठी विकी कौशलने राज ठाकरे यांचे आभार मानले. या वेळी विकी कौशलने कुसुमाग्रजांची कणा ही कविता सादर केली. ‘ओळखलंत का सर मला…’ म्हणत त्याने या कवितेचे सादरीकरण केले. छावा चित्रपटामुळे विकी कौशलला महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांच्या मनात आदराचे स्थान दिले आहे.
आपले चित्रपट संभाजीराजे असेच असतील असे त्याच्या भूमिकेकडून जाणवते. राजेंच्या भूमिकेला विकी कौशलने त्याच्या अभिनयाने योग्य न्याय दिला आहे त्यामुळे या जनतेने त्याला आदरसन्मान दिला आहे. अर्थात विकी कौशल देखील प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या या प्रेमामुळे भारावून गेला आहे. आपल्या कारकिर्दीत ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने आयुष्याचं सार्थक झाल्याची भावना त्याच्या मनात आहे.