
आजवर हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्तथरारक आणि कल्पनेच्या पलीकडचे चित्रपट बनवत होते. मात्र आता मराठी सिनेसृष्टी देखील रसिक प्रेक्षकांची चित्तथरारक चित्रपटांची भूक भागवण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच झोंबिवली हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि या चित्रपटाने संपूर्ण मार्केट खाल्ल आहे. अनेक मराठी प्रेक्षक ह्या चित्रपटाला ५ स्टार रेटिंग देताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी इतर लोकांची देखील उत्सुकता वाढली आहे. झोंबिवली म्हणजे नक्की आहे तरी काय असा सवाल अनेकांना पडला होता.

नुकताच झी मराठीवरील किचन कल्लाकर ह्या कार्यक्रमात झोंबीवलीचे कलाकार देखील आले आणि त्यामुळेच अनेकांना ह्या चित्रपटाची माहिती झाली. २६ जानेवारी २०२२ रोजी चित्रपट प्रदर्शित प्रदर्शित झाला. चित्रपटात असलेली भयानक कहाणी सध्या प्रेक्षकांना फार आवडत आहे. ‘ट्रेन टू भुसान’ आणि Peninsula या चायनीज आणि कोरियन चित्रपटावर आधारित आहे. चायनीज आणि कोरियन चित्रपटांच्या संकल्पनेवर झोंबिवली ची स्टोरी केली गेलीय.यामध्ये झोंबी नावाचा रोग झाल्याने मानस किती विकृत होतात हे दाखवल गेलय. आजवर मराठी सिनेसृष्टीत अनेक भुताचे चित्रपट झाले. मात्र भूत बाधा, पिशाच्च यांच्या पलीकडे हे झोंबी आहेत. जे माणसांना फक्त घवरवत नाही, तर दिसताक्षणी त्या व्यक्तीला जिवंत प्रेत बनवतात. चित्रपटाच्या वेगळ्या कहाणीमुळे या चित्रपटाला प्रेक्षक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. याचाच एक व्हिडिओ अभिनेता अमेय वाघने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘झोंबीवली’ चित्रपटाला प्रेक्षकांचा असलेला प्रतिसाद दिसत आहे.

आख्ख चित्रपटगृह प्रेक्षकांना भरलेलं आहे. आणि प्रेक्षक मोठ्या उत्साहात चित्रपट एन्जॉय करत आहेत.अमेयने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सिनेमात सुधीर जोशी झोंबीला खूप घाबरतो…. पण मराठी प्रेक्षक थेटरात जाऊन ‘झोंबिवली’ बघायला घाबरत नाही! होऊ दे राडा!” अमेयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनी थेटरमध्ये केलेला भन्नाट राडा दिसतो आहे. तसेच चित्रपट किती चांगला आहे हे देखील प्रेक्षक सांगत आहेत. आदित्य सरपोतदार दिग्दर्शीत ‘झोंबीवली’ या चित्रपटात अमेय वाघ, वैदेही परशुरामी, ललित प्रभाकर हे तिन्ही कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाला ४०० ते ५०० स्क्रिन मिळाल्या आहेत. तसेच एकाच दिवसात १.५० ते २ कोटींचे कलेक्शन या चित्रपटाने केले आहे पुढेही हा आकडा आणखीन मोठा होताना पाहायला मिळायची आशा आहे. मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांना मागे टाकत स्क्रिनवर कमाई करताना पाहायला मिळत आहे.