झी मराठी वाहिनीवर आज पासून नवीन कार्यक्रम सुरु होणार आहे . किचन कल्लाकार या शोचे अँकरींन संकर्षण कऱ्हाडे करणार आहे सध्या तो झी मराठी वरील तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेत पाहायला मिळतोय त्याच्या अभिनयाचे सारेच कोतुक करताना पाहायला मिळतात .हि मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका ठरत आहे मधल्या काळात त्याने मालिका सोडली असल्याच्या चर्चा पाहायला मिळत होत्या पण त्याने एक पोस्ट शेयर करत सांगितलं होत कि नाटका निमित्त मालिकेतून ब्रेक घेतलाय मालिका सोडणार वैगरे असं काही नाही आणि आता तो झी मराठीच्याच नवीन शो मध्ये पाहायला मिळतोय. किचन कल्लाकार यात प्रशांत दामले जज म्हणून पाहायला मिळणार आहेत.

या मालिके आधीही या दोघांनी” आम्ही सारे खवैई ”ह्या शो मध्ये एकत्र काम केलेले पाहायला मिळाले होते आणि आता लिटल चॅम्प च्या जागेवर बुधवार ते गुरवार रात्री ९. ३०वाजता ”किचन कल्लाकार” हा शो दाखवला जाणार आहे . या शो मध्ये सेलिब्रेटी येऊन आपल्या स्वयंपाकाची जादू दाखवणार आहेत .यात भल्या भल्या कलाकारांची शिटी वाजत मनोरंजनाची चव वाढणार असं म्हणायला हरकत नाही. हा शो एंटरटेनमेंट आणि कॉमेडी असा असणानार हे या दाखवलेल्या प्रोमो वरून पाहायला मिळतंय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ”चला हवा येऊ द्या ”च्या कलाकारांनी त्यांनी बनवलेल्या स्वयंपाकाचे मजेशीर किस्से सांगितले. कुशल बद्रिकेने सांगितलेला किस्सा ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. तो म्हणतो एक दिवस बायको कामाला गेलेली म्हणून मी म्हटलं आज आपण भाजी बनवावी आणि मी काळ्या चण्याची भाजी बनवायची म्हणून आईला फोन केला आणि रेसिपी विचारली आईने सांगितली आणि मी बनवायला घेतली. काळे चणे घेतले त्यात पाणी टाकून शिजवायला ठेवले आणि २ -३ तास झाले तरी ते शिजत नव्हते म्हणून आईलापरत फोन केला आणि विचारलं हे शिजत का नाहीत. तेव्हा आई म्हणाली ते आधी भिजू घालून मोड यायला ठेवावे लागतात त्याला दोन दिवस लागतात नंतर ते शिजवतात तेव्हा मी पहिला आणि शेवटचा स्वयंपाक बनवला .

श्रेया बुगडेनी हि एक मजेशीर किस्सा सांगितला तिला स्वयंपाक येत नाही यावरून नेहमीच चला हवा येऊ द्या मध्ये तिच्यावर जोक मारलेले पाहायला मिळतात. ती म्हणते जेव्हा लग्नाच्या नंतर पहिल्यांदा गणपती बसवले होते तेव्हा उकडीचे मोदक सासूबाईंनी करायला सांगितले आणि मी सांगितलं मला येत नाहीत तेव्हा त्या म्हटल्या मी जशी करतेय ते पाहून तू बनव माझी नणंद आणि सासूबाई एकदम उत्तम बनवत होत्या त्यांनी २० मोदक बनवले आणि शेवटचा एक मला बनवायला दिला असे मिळून २१ बनवायचे होते तो बनवला आणि शिजून ते झाल्यावर सगळ्यांना वाटायला आणला तेव्हा मी बनवलेला मोदक वेगळाच दिसत होता चपटा आणि वेगळाच . वंदना गुप्ते यांनीही एक मजेशीर किस्स्सा सांगितला त्या सांगतात आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा उपवासाच्या दिवशी खिचडी बनवली जायची आम्ही मोठ कुटुंब होत त्यामुळे आम्हा मुलांना एक एक घासाची खिचडी मिळायची जेवण भरपूर असायचं पण खिचडी थोडीच भेटायची आणि मला खिचडी खूप आवडायची तेव्हा मी ठरवलं लग्ना नंतर मी भरपूर खिचडी करून खाणार खरंतर मी खिचडी मिळावी म्हणून लग्न केलं असा त्या हसत म्हणाल्या .