
झी मराठी वाहिनीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे दिसून येत आहे. ही मालिका आहे “ती परत आलीये”. झी मराठी वाहिनीवर रात्री १०.३० वाजता ही मालिका प्रसारीत केली जात आहे. सायली, अभ्या, रोहिणी, अनुजा, हनम्या, विक्रांत, मॅंडी, बाबुराव, लोखंडे ही सर्व पात्र प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. नुकतेच या मालिकेतील हनम्याने एक्झिट घेतली आहे त्यामुळे त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या मुखवटा घातलेल्या व्यक्तीच्या ते शोधात आहेत. मालिकेच्या सुरुवातीपासूनच कुंजीका काळविंट, तन्वी कुलकर्णी, विजय पाटकर, अनुप बेलवलकर, वैष्णवी करमरकर, श्रेयस राजे, समीर खांडेकर, नचिकेत देवस्थळी, प्रथमेश शिवलकर या कलाकारांनी मालिकेत महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.

मालिकेच्या पहिल्या भागात सर्व मित्र एकत्रित येऊन सेलिब्रेशन करत असतात तिथेच या सर्वांची मैत्रीण निलांबरीला हे सर्वजण स्विमिंग पूलमध्ये फेकून देतात. निलांबरीला पोहोता येत नसल्याने दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसतो त्यावेळी हे सर्वजण घाबरून जातात. ही घटना घडून अनेक वर्षे लोटतात तेव्हा हेच सर्व मित्र पुन्हा एकदा एकत्र येतात पण ह्यावेळी ते कोणाच्या जाळ्यात सापडतात याचे गूढ मात्र अजूनही कोणालाच उलगडलेले नाही. मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना एका जागेवर खिळवून ठेवण्यास सक्षम ठरली होती मात्र त्यानंतर मालिकेत अनेक घडामोडी घडत चाललेल्या दिसत आहेत. शिवाय मालिका लवकरच एका निर्णयावर येऊन पोहोचलेली पाहायला मिळत आहे. ह्या सर्व घडामोडी कोणामुळे घडत आहे हेही लवकरच उघड होणार आहे. त्यामुळे मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार हे स्पष्ट झालं आहे. १६ ऑगस्ट २०२१ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता मात्र मालिकेला प्रेक्षकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने आणि टीआरपी कमी असल्याने ती परत आलीये ही मालिका अल्पावधीतच आटोपती घेण्यावर अधिक भर दिला जात आहे.

अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीतच मालिकेच्या निर्मात्यांना मालिका बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे या मालिकेच्या जागी आता कोणती नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष्य लागून राहिले आहे. येत्या काही दिवसात देवमाणूस ही लोकप्रियता मिळवलेली मालिका पुन्हा एकदा नव्या रुपात पाहायला मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. “देवमाणूस२” हा मालिकेचा पुढचा भाग लवकरच म्हणजे डिसेंम्बर महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी चर्चा रंगली आहे अर्थात देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती मालिकेचा शेवट मात्र अर्धवटच राहिल्याने ही शक्यता अधिक खात्रीदायक होताना दिसत आहे. येत्या काही दिवसातच या नव्या मालिकेबाबत लवकरच जाहीर करण्यात येईल पण त्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी वाट पहावी लागणार. तूर्तास ती परत आलीये ही मालिका आता काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार हे मात्र निश्चित झालं आहे.