झी वाहिनीवरील किचन कल्लाकर शो अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना पाहायला मिळाला. मराठी चित्रपट मालिका यांतील कलाकार शो मध्ये भाग घेऊन मराठमोळे खाद्य पदार्थ बनवताना पाहायला वेगळीच मज्जा येते. पण ह्यावेळी किचन कल्लाकर शो मध्ये कलाकार भाग घेणार नसून देशसेवेसाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती शो मध्ये सहभागी होणार आहेत. २६ जानेवारी गणतंत्र दिवसानिमित्त हा केलेला बदल देखील प्रेक्षकांना खूपच आवडणार हे निश्चित विशेष म्हणजे संकर्षण कऱ्हाडे पुन्हा ह्या शो मध्ये सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपासून अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ह्याच्या जागी अभिनेत्री श्रेया बुगडे ह्या शो ची धुरा सांभाळत होती पण २६ जानेवारी गणतंत्र दिवसानिमित्त खासकरून पुन्हा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हाच सूत्र संचालन करताना पाहायला मिळणार आहे. शो मध्ये येणारे व्यक्ती देखील खूपच खास आहेत. दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब ह्या शोमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर दुसरी खास व्यक्ती म्हणजे आयर्न मन म्हणून सर्व परिचित असलेले पिंपरी चिंचवड शहराचे आयपीएस ऑफिसर कृष्ण प्रकाश हे देखील पाहायला मिळणार आहेत. तिसरी खास व्यक्ती एक महिला असून २५ मीटर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत भाग घेणारी एक भारतीय महिला खेळाडू जिला काही दिवसांपूर्वी अर्जुन पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं आहे अशी कोल्हापूरची राही जीवन सरनोबत हि देखील सहभागी होताना पाहायला मिळणार आहे. ३ वेगवेगळ्या क्षेत्रातील आघाडीच्या देशप्रेमी व्यक्तींना खाद्य पदार्थ बनवताना पाहायला मिळणार म्हणून देखील प्रेक्षक नक्कीच आतुर असणार.

उज्ज्वल निकम साहेब, कृष्ण प्रकाश साहेब आणि राही सरनोबत नक्की कोणते पदार्थ बनवणार हे अजूनतरी गुलदस्त्यात आहे पण ह्यांच्या येण्याने शो मध्ये वेगळाच रंग चढलेला पाहायला मिळणार हे नक्की. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा काही भागात न दिसल्यामुळे अनेकांनी नाराजी दर्शवली होती. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ह्याच सूत्रसंचालन खूपच सुंदर आहे त्यामुळेच ह्या खास दिवशी आवर्जून त्यालाच सूत्रसंचालनाची धुरा सांभाळायला दिली असल्याचं बोललं जातंय. उज्ज्वल निकम साहेब, कृष्ण प्रकाश साहेब आणि राही सरनोबत ह्यांच्या मदतीला राजशेफ जयंती कठाळे असल्यामुळे त्यांना पदार्थ बनवायला नक्कीच मदत मिळेल आणि त्यात ते यश्वी देखील होतील यात शंका नाही. असो २६ जानेवारी गणतंत्र दिवसानिमित्त किचन कल्लाकर शोला आणि येणाऱ्या व्यक्तींना आमच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा..