झी मराठी २०२१ सोहळा नुकताच पार पडला. झी वाहिनी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आपली वाहिनी झी वाहिनी म्हणत त्यांनी एकाहून एक उत्कृष्ट मालिका प्रेक्षकांसमोर सादर केल्या. ज्यावेळी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवली होती त्या काळात ह्याच वाहिनीच्या मालिकांनी प्रेक्षकांना परत मराठीकडे खेचून आणण्याचे काम केले आणि त्यात ते खूप यशस्वी देखील झाले. संध्याकाळ झाली कि घराघरातून झी वाहिनीच्याच मालिकांचे आवाज घुमू लागायचे. विशेष करून महिला वर्ग ह्या मालिकांच्या फॅन असायच्या. संध्याकाळी ६.३० पासून ते रात्री १० पर्यंत जवळपास प्रत्येक मराठी घरात झी वाहिनीचा पाहिली जायची. पण गेल्या २ वर्षांपासून झी वाहिनीच्या मालिकांनी प्रेक्षकांची निराशा केली.

माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला, अग्गबाई सासूबाई ह्या मालिका सुरवातीला खूपच गाजल्या पण मालिका चालताहेत म्हणून त्या संपवण्याचा निर्णय न घेता तश्याच चालू ठेवल्या मग त्यात नवनवीन कलाकार भरून मालिकेत ट्विस्ट निर्माण केला जाऊ लागला. मालिका भरकटू लागल्या प्रेक्षकांची हिरमोड झाली आणि ह्या मालिकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पण पुन्हा एकदा झी वाहिनीने योग्य निर्णय घेत जुन्या मालिकांच्या जागी नव्या मालिका आणल्या आणि त्या यशस्वी देखील होताना पाहायला मिळाल्या. “माझी तुझी रेशीमगाठ” हि मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. मालिकेतील सर्वच कलाकार उत्तम अभिनय करताना पाहायला मिळाले. त्यामुळेच २०२१ च्या झी मराठी अवॉर्ड सोहळ्यातही ह्याच मालिकेला सर्वाधिक बक्षिसे मिळाली. पण हा अवॉर्ड सोहळा झाल्यावर अनेकांनी अवॉर्ड्स बद्दल प्रश्न उपस्थित केले. “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतील अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिला ३ अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. पण ह्याच मालिकेच्या तोडीस तोड असलेली “मन उडू उडू झालंय” या मालिकेतील अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिला एकही अवॉर्ड न मिळाल्याने प्रेक्षक नाराज झाले. खरंतर ऋता दुर्गुळे हिची मेहनत मालिकेत दिसून येते. ह्या मालिकेचं संपूर्ण श्रेय देखील प्रेक्षक तिलाच देताना पाहायला मिळतात. त्याच कारही तसेच आहे..

मन उडू उडू झालं ह्या मालिकेतील अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिचा अभिनय देखील उत्तम आहे शिवाय ती लक्षवेधी अभिनेत्री देखील आहे. मालिकेत तिचं वर्चस्व दिसून येत. डान्स, डायलॉग, रडणं, मुरडन आणि हळवेपणा तिचं सर्वकाही पाहण्यासारखं आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहे मालिकेत वडिलांबद्दल तिचा सीन ती बाहेर वावरताना तिचे हावभाव तीच इतर लोकांशी बोलणं आणि सर्वाना समजून घेणं ह्यामुळे तिला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. “दुर्वा”, “फुलपाखरू” आणि आताच्या “मन उडू उडू झालं” ह्या मालिकेत तिचा अभिनयात सर्वात चांगला असल्याचं बोलल गेलं. मग इतकं सगळं असून देखील ऋताला एखादातरी पुरस्कार का दिला गेला नाही असं अनेकांनी म्हटलेलं पाहायला मिळतय. झी वाहिनीने ह्यापूर्वी देखील ऋताला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. २०१९ साली ऋताला झी ने “झी युवा सन्मान २०१९” सन्मानित करण्यात आलं होत. यांनतर झी वाहिनीने “मोस्ट नॅच्युरल परफॉर्मन्स ऑफ द इअर”ने सन्मानित केलं होत. विशेष म्हणजे संस्कृती कलादर्पण २०१९ चा बेस्ट ऍक्टरेस अवॉर्ड “दादा गुड न्युज आहे”ह्या नाटकासाठी ऋताला देण्यात आला होता. डबेवालीपेक्षा बँकवाली सरस असल्याचं अनेकांचं मत आहे. मग ह्या मालिकेत उत्तम अभिनय साकारून देखील तिला अवॉर्ड मिळाला नसल्याने प्रेक्षक नाराज झालेत. डबेवालीने अवॉर्ड्स मध्ये बाजी मारली असली तरी बँकवालीने प्रेक्षकांची मने जिंकलेली पाहायला मिळत आहे.