कलर्स मराठीवरील ‘योगयोगेश्वर जय शंकर’ हि मालिका सध्या तुफान गाजत आहे. ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेत बालशंकर अंतापूर सोडून जगत कल्याणासाठी निघणार हा आध्यात्मिक टप्पा सध्या लवकरच पाहायला मिळणार आहे. मालिकेत चिमणाजी आणि पार्वती या दांपत्याने बालशंकरचा केलेला सांभाळ आणि आता त्याने त्यांना सोडून जाण्याचा असा भावुक क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आरुष बेडेकर, अतुल आगलावे, पल्लवी पटवर्धन, सोनाली पाटील आणि उमा हृषीकेश यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेतील अभिनेत्री “उमा ऋषिकेश” हिच्या बद्दल आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. झी वाहिनीच्या अग्गबाई सुनबाई ह्या मालिकेमुळे अभिनेत्री “उमा ऋषिकेश” हिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

ह्या मालिके आधी देखील तिने काही मालिका आणि व्यावसायिक नाटके देखील केली आहेत. अग्गबाई सुनबाई या मालिकेअगोदर ‘स्वामिनी’ या लोकप्रिय मालिकेतून उमाने पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. एसएनडीटी महाविद्यालयातून उमाने एमएची पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय कथ्थक आणि शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षणही तिने घेतले आहे. आई शिक्षिका असल्यामुळे लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी होती आणि कलेची आवड होती. आई आणि वडिलांनी लहानपणापासूनच कथ्थक आणि शास्त्रीय संगीत अश्या कला जोपासण्यासाठी पाठिंबा दिला. कॉलेज शिक्षण घेत असतानाच तिने नाट्यसंगीताचा डिप्लोमा देखील केला. ठाणे सेंटरमधून नाट्यसंगीताच्या सादरीकरणात उमा प्रथम आली आणि पारितोषिक तिला प्रशांत दामले यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी अभिनेते प्रशांत दामले यांनी तिला “संगीत संशयकल्लोळ” ह्या नाटकातील रेवतीच्या भूमिकेसाठी विचारणा केली. अश्या प्रकारे तिला रंगभूमीवर मोठ्या कलाकारानंसोबत काम करायला मिळालं आणि देश विदेशात ह्या नाटकाचे अनेक प्रयोग यशस्वी रित्या पार पडले. उमा ऋषिकेश हिचे पूर्ण नाव आहे “उमा ऋषिकेश पेंढारकर”. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल कि प्रसिद्ध गायक, नाट्य दिग्दर्शक ज्ञानेश पेंढारकर हे तिचे सासरे तर प्रसिद्ध नाट्य कलाकार, गायक भालचंद्र पेंढारकर यांची ती नातसून होय.

भालचंद्र पेंढारकर यांनी सत्तेचे गुलाम, शाब्बास बिरबल शाब्बास, आनंदी गोपाळ, दुरितांचे तिमिर जावो, स्वामिनी अशी अनेक नाटके केली. आपल्या नावापुढे पेंढारकर घराण्याच नाव लागल्याचा तिला अभिमान आहे. उमाचा नवरा ऋषिकेश पेंढारकर हे आर्किटेक्ट आणि इंटेरिअर डिझायनर आहेत. ऋषिकेश ला देखील संगीताची खूप आवड आहे अभिनयापासून तो दूरच आहे पण सेटवर अनेकदा हजेरी लावताना पाहायला मिळतो. उमा आणि ऋषिकेश यांचे फोटो सोशल मीडियावर तुम्हाला क्वचितच पाहायला मिळतील मात्र हे दोघेही एकमेकांना अनुरूप आहेत हे त्यांचे फोटो पाहून समजेल. प्रशांत दामले यांच्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकात उमाने रेवतीची भूमिका साकारली होती. अभिनयासोबतच संगीताचीही आवड असलेल्या उमासाठी हे नाटक खूपच खास ठरले होते. या भूमिकेसाठी तिला राज्यपुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. अभिनेत्री उमा ऋषिकेश पेंढारकर हीला ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…