Breaking News
Home / जरा हटके / स्वीटूची पार्लर मालकीण ममता काकीला ओळखलंत? गुरुनाथला धु धु धुतला होता

स्वीटूची पार्लर मालकीण ममता काकीला ओळखलंत? गुरुनाथला धु धु धुतला होता

येऊ कशी तशी मी नांदायला नांदायला मालिकेत आता ओम ने स्वीटू आणि आपल्या प्रेमाची कबुली नलू मावशी व तिच्या घरच्यांसमोर दिली आहे. नलू मावशी लग्नाला तयार नसली तरी स्वीटूचे बाबा ओमला १५ दिवसांसाठी स्वतः कष्ट करून गरिबीत जगून दाखवलं तर ते दोघांच्या लग्नाला तयार होतील अशी अट घातली आहे. ह्यामुळे मालिका आता नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. स्वीटू हि देखील एका पार्लर मध्ये काम करतेय त्या पार्लरची मालकीण ममता काकी हि नेहमी स्वीटूला घालून पाडून बोलते शिवाय मालविकाच्या सांगण्यावरून तिने नलू मावशीला स्वीटूच्या लग्नासाठी मुद्दाम जाड मुलाचं स्थळ देखील सुचवलं होत. आज आपण पार्लर मालकीण ममता काकी साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात …

actress varsha padwal
actress varsha padwal

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत पार्लर मालकीण ममता काकीची भूमिका साकारली आहे “वर्षा पडवळ” ह्या अभिनेत्रीने. वर्षा पडवळ ह्यांना तुम्ही ह्यापूर्वी अनेक मालिकांत पाहिलं असेलच. “माझ्या नवऱ्याची बायको”, “सुखी माणसाचा सदरा”, “श्रीमंत घरची सून”, “डॉक्टर डॉन” , “सहकुटुंब सहपरिवार”, “देव पावला” , “मोलकरीणबाई ” , “जिजामाता” अश्या अनेक मालिकांत त्यांनी छोटे मोठे पण तितकेच महत्वाचे रोल केले आहेत. माझ्या नवऱ्याची बायको सिरीयल मध्ये त्यांनी लेडीज सिक्योरिटी गार्डचा रोल निभावला होता त्यात त्यांनी गुरुनाथला दिलेला चोप हा गमतीदार भाग प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेमुळे अभिनेत्री वर्षा पडवळ चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मालिकां व्यतिरिक्त त्यांनी काही शॉर्ट फिल्म देखील साकारल्या आहेत. अभिनया सोबत त्यांना डान्स करायची देखील खूप आवड आहे. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत त्या खडूस, स्वार्थी आणि घालून पडून बोलणाऱ्या महिलेच्या स्वभावाच्या दाखवल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात त्या खूप मनमेळाऊ स्वभावाच्या आहेत.

actress varsha padwal in mazya navryachi bayko
actress varsha padwal in mazya navryachi bayko

मालिकेत मालविकाच्या सांगण्यावरून ममता काकी स्वीटूच्या आयुष्यात पुढे आणखीन काय काय विघ्न आणणार हे येत्या काही भागात पाहायला मिळणार आहे. ओम खरंच गरिबीत दिवस काढणार का? आणि स्वीटू पार्लर मध्ये आणखीन कोणकोणत्या समस्यांना सामोरे जाणार.. तसेच रॉकी आणि चिन्या हे दोघे ओम आणि स्वीटूला कशी मदत करणार हे सर्व येत्या काही भागात तुम्हाला पाहायला मिळेलच.. असो. पार्लर मालकीण म्हणजेच अभिनेत्री “वर्षा पडवळ” ह्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *