Breaking News
Home / जरा हटके / येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेचा महाएपिसोड खूपच निराशाजनक

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेचा महाएपिसोड खूपच निराशाजनक

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेचा कालच्या रविवारी दोन तासांचा विशेष भाग प्रक्षेपित करण्यात आला होता. मालिकेच्या प्रोमोमध्ये स्वीटू हार घेऊन उभी असते आणि अंतरपाट खाली पडताच तिच्या समोर वेगळेच काही तरी घडते या अविर्भावात येऊन ती स्तब्ध उभी राहते. हा उत्कंठा वाढवणारा महा एपिसोड मात्र भलत्याच गोष्टीवर खर्ची करण्यात आला हे कालच्या भागात सिद्ध झाले. प्रत्यक्षात दोन तासाच्या एपिसोड मध्ये मालिकेत ओम लग्न सोडून दादांना शोधायला जाताना दाखवला आणि इकडे लग्न मंडपात स्वीटू मात्र मोहितसोबत स्वतःचे लग्न उरकून घेते.

yeu kashi tashi mi nandayla actor
yeu kashi tashi mi nandayla actor

प्रोमोमध्ये दाखवला जाणारा ट्विस्ट प्रत्यक्षात प्रेक्षकांना कुठेच पाहायला मिळाला नाही उलट मोहित स्वीटूच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्याशी लग्न करून मोकळा होतो. ही सरळसरळ प्रेक्षकांची केलेली फसवणूकच आहे, प्रेक्षक एक मनोरंजन म्हणून ही मालिका पाहत असले तरी मालिकेचा ट्विस्ट मात्र दिशाभूल करणारा आहे. ओम आणि स्वीटू विवाहबद्ध होतील या आशेने त्यांनी हा दोन तासांचा महाएपिसोड पाहिला मात्र हा महा एपिसोड खरंच निराशाजनक ठरला. कारण दोन तास टीव्हीसमोर घालवून शेवटी मालिकेच्या लेखकाने ही कथा वेगळ्याच ट्रॅकवर नेऊन सोडली आणि म्हणूनच प्रेक्षकांनी या मालिकेबाबत निराशाजनक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या मालिकेमुळे आमचे दोन तास फुकट गेले असेच चित्र आता या मालिकेबाबत निर्माण झाले आहे. देवमाणूस मालिकेने देखील असेच महाएपिसोडमध्ये निराशा केल्याचे समोर आले होते आता येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतदेखील गोंधळ घातल्याचे दिसून येताना पाहायला मिळतेय.

yeu kashi tashi mi nandayla maha episode
yeu kashi tashi mi nandayla maha episode

तसे पाहता देवमाणूस या मालिकेच्या प्रोमोमध्ये देखील देवीसिंग पोलीसांच्या तावडीत सापडल्याचे दर्शवले होते. आणि जेव्हा मालिकेचा शेवटचा भाग दाखवला गेला त्यावेळी देवीसिंग अजूनही मोकटच असल्याचे दर्शवले. त्यामुळे मालिका संपली नसल्याचे भाकीत करण्यात आले. प्रोमोमध्ये वेगळेच काहीतरी दाखवून या मालिका प्रेक्षकांची फसवणूक आणि पर्यायाने दिशाभूल करत आहेत अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया प्रेक्षकांनी आता व्यक्त केल्या आहेत. दरवेळी येणारे हे असह्य ट्विस्ट खरंच गरजेचे असतात का? यातून त्या मालिकेला नेमके काय साध्य करायचे आहे? असेही प्रश्न आता प्रेक्षकांनी विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळतील की नाही हे अनुत्तरित असले तरी लेखकाने आपल्या लेखणीतून वास्तविकता दाखवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे….

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *