येऊ कशी तशी मी नांदायला मालिका सुरवातीपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण ओम आणि स्वीटूयांचं लग्न न होता मालिकेत मोहित आणि स्वीटू यांच लग्न झालं आणि प्रेक्षकांनी मालिकेकडे पाठ फिरवली. मालिकेत एकामागून एक नवनवे कलाकार पाहायला मिळाले. प्रिया मराठे हिची देखील मालिकेत एन्ट्री झाली आणि तिच्या ऑफिसमध्ये ओम आणि स्वीटू काम करताना पाहायला मिळाले.खरतर प्रिया मराठे हिची एन्ट्री स्वीटू आणि ओम ह्यांना एकत्र आणण्याकरता झाली असल्याचं बोललं गेलं. पण आता मालिकेत आणखीन एक ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय.

ओम ची आई शकू हिची मालिकेतून एक्झिट झालेली पाहायला मिळण्याची चर्चा आहे. एका प्रोमोमध्ये तिच्याजागी दुसरीच मराठी अभिनेत्री पाहायला मिळतेय. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनायाची आई साकारणाऱ्या अभिनेत्री किशोरी आंबिये आता शंकूच्या लूकमध्ये पाहायला मिळतेय. त्यामुळे आता ओमची आई शकू आता किशोरी आंबिये साकारताना पाहायला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. पण जुनी शकु साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी गोखले या मालिकेतून बाहेर का पडल्या असतील हे मात्र समजू शकले नाही. अभिनेत्री किशोरी आंबिये आपल्याला नेहमीच निगेटिव्ह भूमिका साकारताना पाहायला मिळतात पण आता शांत स्वभावाच्या आणि हळव्या मनाच्या ओमच्या आईच्या भूमिकेत त्या कसा अभिनय साकारणार हे थोडं प्रेक्षकांना खटकणारचं असल्याचं दिसतंय. किशोरी आंबिये ह्या एक उत्तम अभिनेत्री आहेतच हा रोल देखील त्या यशस्वीपणे साकारत अशी आशा बाळगुयात अभिनेत्री किशोरी आंबिये याना मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा…