झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या लोकप्रिय मालिकेतील स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने एक गुड न्यूज दिली आहे. First are always special! असे म्हणत माझी पहिली वाहिली कार असे कॅप्शन देऊन अन्विता फलटणकर हिने पहिल्या वहिल्या गाडीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिली गाडी आपल्यासाठी खूप खास असते आणि म्हणूनच अन्विताचा आनंद आता गगनात मावेनासा झालेला पाहायला मिळतो आहे. अनके कलाकारांनी देखील तीच अभिनंदन केलेलं पाहायला मिळतंय.

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत गेल्या ३-४ भागांपासून आपल्याला अन्विता पाहायला मिळत नाहीये तिच्या जागी कोणीतरी दुसरीच महिला पाठमोरी दाखवली जातेय आणि तिचा वेगळा व्हिडिओ शूट करून त्या व्हिडिओत तास दर्शवत आहेत जेणेकरून अन्विताच म्हणजे स्वीटूच त्या ठिकाणी असल्याचं भासत आहे. नीट पाहिल्यावर तुमच्याही हे लक्षात येईल लाईट आणि व्हिडिओ मधील आवाज देखील खूप वेगळे वाटतात हे असे का केले जातंय हे समजू शकत नाही. असो अन्विता फलटणकर ही ठाण्याची. लहानपणापासूनच अन्विताला अभिनयाची आणि नृत्याची आवड होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रमातुन ती नेहमी सहभाग घ्यायची.पुढे डी जी रुपारेल कॉलेजमधून तिने पदवीचे शिक्षण घेतले. ‘टाईमपास’ या चित्रपटातून अन्विताचे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले. त्यानंतर ‘गर्ल्स’ या चित्रपटात ती सहाय्यक भूमिकेत झळकली होती. बोल्ड आणि बिनधास्त पण तितकीच विनोदी अशी रुमीची भूमिका तिने या चित्रपटात साकारली होती. येऊ कशी तशी मी नांदायला ही तिची पहिली टीव्ही मालिका आणि या मालिकेत ती मुख्य भूमिका निभावताना दिसली.

मालिकेत तिने साकारलेली स्वीटू प्रेक्षकांना देखील खूपच भावली. मालिकेतून तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. नुकतेच मालिकेत स्वीटू आणि ओमचे लग्न झाले आहे मात्र शकू मावशीचे आजारपण तिच्यापासून लपलेले नाही. त्यामुळे स्वीटू आता शकू मावशीला आधार देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मालिका सध्या रंजक वळणावर आहेच मात्र अन्विता फलटणकर या मालिकेमधून आता चांगलीच कमाई करताना दिसत आहे. तीच्या पहिल्या गाडीच्या आगमनाने आता तिचा हा आनंद आणखीनच द्विगुणित झालेला पाहायला मिळतो आहे. ब्राऊन रंगाची Hyundai औरा ही कार तिने नुकतीच खरेदी केली आहे. या गाडीची किंमत साधारण ८ ते ९ लाखांच्या आसपास आहे. गेल्या वर्षी देखील अनेक मराठी सृष्टीतील कलाकारांनी गाड्यांची खरेदी केली होती. स्वप्नील जोशीने त्याच्या पत्नीच्या वाढदिवशी महागडी गाडी खरेदी करून तिला गिफ्ट केली होती. तर अमेय वाघ, संदीप पाठक, वैदेही परशुरामी या कलाकारांनी देखील नवी गाडी खरेदी करून आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला होता.