येऊ कशी तशी मी नांदायला ही झी मराठी वाहिनीवरील मालिका गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगला सामोरी जात आहे. मालिकेत स्वीटू आणि मोहित चे लग्न झाल्यापासून मालिकेचा ट्रॅक पूर्णपणे बदलल्याने या मालिकेला अनेकांनी धारेवर धरले. इतके दिवस होऊनही स्वीटूला सत्य समजले नाही हीच या मालिकेची शिकांतिका वाटत आहे अशीच प्रतिक्रिया प्रेक्षक सोशल मीडियावर देत आहेत. प्रेक्षकांची नाराजी दूर करण्यासाठी या मालिकेत मोठा ट्विस्ट आणण्यात आला आहे. हा ट्विस्ट मालिकेचे संपूर्ण रुपच पालटणार आहे.

ओम आणि स्वीटू यांच्यात वाढलेली दरी अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे सोज्वळ भूमिकेत दिसणार ओम आता लवकरच बॅड बॉयच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ओम मध्ये झालेला हा मोठा बदल स्वीटूला मान्य असेल का किंवा त्यांच्यात वाढलेला दुरावा कमी करेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सोज्वळ आणि साधा सरळ वागणारा ओम आता बॅड बॉय बनून स्वीटूच्या मनात जागा निर्माण करेल का हे येत्या काही दिवसातच मसलिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकतेच ओम आता बॅड बॉय च्या भूमिकेत दिसणार आहे ह्या कथानकात केलेल्या बदलाचे चित्रीकरण नुकतेच सुरू करण्यात आले आहे काही दिवसातच ओममध्ये झालेला हा मोठा बदल प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा आहे. आपला हेतू साध्य करण्यासाठी ओम स्वतःला बॅड बॉयच्या भूमिकेत कसा सर्वांना सामोरे जातो हे पाहणे आता रंजक होणार आहे त्याच्या अशा वागण्याने कोणा कोणाला खास करून स्वीटूला रुचनार का? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मात्र असे असले तरी ओमच्या मूळ स्वभावाची जाणीव त्याच्या जवळच्या व्यक्तींना नक्कीच होणार आहे. आणि तो असा का वागतो आहे हेही लवकरच सगळ्यांसमोर उघड होईल. तूर्तास मालिकेत झालेला हा मोठा बदल प्रेक्षकाना रुचणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. शाल्व किंजवडेकर याने ओमची भूमिका आजवर त्याच्या अभिनयाने चांगली वठवली आहे. आता तो बॅड बॉय बनून विरोधी भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ही भूमिका देखील तो तितक्याच सहजतेने निभावेल अशी खात्री आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका सजग केल्या आहेत. इतके दिवस टीकेच्या धारेवर धरलेले हे कलाकार आपापल्या भूमिका अगदी चोख बजावत आहेत. आता मालिका पाहायला प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील ह्यात शंका नाही नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळणार ह्यावर प्रेक्षक काय म्हणतात तेही महत्वाचं असेल.