येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत आता स्वीटू आणि ओम ह्यांच्या प्रेमाची माहिती त्यांच्या घरच्यांना झालेली आहे. ओम ची आई शकू दोघांच्या लग्नाला तयार असली तरी स्वीटू ची आई सरू हिचा मात्र विरोध आहे. मालिकेत स्वीटू हे पात्र सर्वाना हवंहवंसं वाटतंय कारण ती सर्वाना सांभाळून घेते. मालिकेत आता स्वीटू एका पार्लर मध्ये काम करताना पाहायला मिळतेय. त्या पार्लर मधील मालकीण आता स्वीटू साठी स्थळ शोधून आणतेय त्याच नव्या पात्राची आता एन्ट्री होणार आहे चला तर पाहुयात हे नवीन पात्र नक्की आहे तरी कोण …

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत स्वीटूला लग्नासाठी पाहायला येणाऱ्या नव्या पात्रच खरं नाव आहे “मनमीत पेम”. मनमीत पेम ह्या कलाकाराला तुम्ही ह्यापूर्वी देखील चित्रपट आणि मालिकांत पाहिलं असेल. “टाईमपास”, “व्हेंटिलेटर”, “फोटोकॉपी” अश्या अनेक चित्रपटांत तो झळकला आहे. तर प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू ह्या व्यावसायिक नाटकात देखील त्याने काम केले आहे. ह्याच सोबत डब्बा गुल ह्या मालिकेत देखील तो झळकला होता. स्वीटू प्रमाणेच हे नवीन पात्र जाड असल्याने दोघे पाणीपुरी खायला जातानाच्या सीन मध्ये त्याच्यावर लोक हसून जोक मारतात त्यावेळी स्वीटू त्या लोकांना एखाद्याच्या शरीरावरुन त्याची टिंगल करू नये असा एक व्हिडिओ नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. ह्या नवीन कलाकारामुळे मालिकेत नक्कीच नवा रंग चढेल ह्यात शंका नाही. ह्या आधीच्या भागात देखील पार्लर मध्ये ओम ने पार्लर मालकिणीला खडेबोल सुनावले होते तो भाग चांगला गाजला होता. त्यानंतर ओम ची बहीण मालविका हि पार्लर मालकिणीला हे स्थळ शोधण्यास भाग पाडते असे दाखवण्यात आले. चला तर मग पाहुयात मालिकेत पुढे काय होणार आहे..