‘येऊ कशी तशी मी नांदायला’ हि मालिका सुरु झाली आणि आगळ्यावेगळ्या कहाणीमुळे ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस देखील उतरली. अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. पण मालिकेत नवा ट्विस्ट निर्माण करायचा म्हणून ओम आणि स्वीटू यांच्या लग्नात ओमला बाजूला करून त्याच्याजागी मोहित आणि स्वीटू यांचं लग्न दाखवलं. प्रेक्षकांना मालिकेत केलेल्या ह्या निगेटिव्ह चेंजमुळे मालिकेला चांगलंच ट्रॉल केलं इतकंच नाही तर अनेकांनी हि मालिका पाहण देखील सोडलं. मालिकेचा टीआरपी चांगलाच घसरला तरी देखील ८ च्या प्राईम टाईमलाच आजही मालिका प्रक्षेपित होते.

मालिकेचा टीआरपी वाढावा म्ह्णून आता मालिकेत पुन्हा ओम आणि स्वीटू यांची प्रेम कहाणी ” अधुरी प्रेम कहाणी” आता पुन्हा पाहायला मिळणार असल्याचं दिसून येतंय. मालिकेच्या प्रोमोमध्ये दोघांचं प्रेम जुळून आल्याचं दर्शवलं जातंय. मोहीतला डिव्होर्स देऊन आता पुन्हा स्वीटू आणि ओम एकत्र येताना दिसतात. पण आधीच पाठ फिरवलेल्या प्रेक्षकांना पुन्हा वळवून आणण्यात मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना कितपत यश येतंय हे पाहावं लागेल. मालिकेचे लिखाण भरकले असले तरी मालिकेतील कलाकार आजही उत्तम अभिनय करताना पाहायला मिळतात अभिनयाच्या जोरावरच मालिकेने काही प्रेक्षकांना टिकवून ठेवलंय असं म्हणायला हरकत नाही. त्यात सोने पे सुहागा म्हणजे ह्या मालिकेच्या नंतर झी मराठीची सर्वात फेमस मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” दाखवली जाते. ती पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. ह्याचाच फायदा येऊ कशी तशी मी नांदायला ह्या मालिकेला मिळालेला पाहायला मिळतो. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचे चाहते आपोआपलच काही काळ आधीच झी वाहिनीकडे खेचले जातात ह्याचा फायदा स्वीटू आणि ओम यांच्या मालिकेला मिळालेला पाहायला मिळतो.

प्राईम टाईलमला असलेल्या मालिका नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. पण झी वहिनींच्या मालिकांना दुसरा पर्याय आज देखील उपलब्ध नसलेला पाहायला मिळतो. “आई कुठे काय करते” मालिका खूपच गाजली पण गेल्या महिन्याभरापासून मालिकेतील केलेले बदल प्रेक्षकाना मुळीच रुचले नाहीत. त्यामुळे ह्या मालिकेचा देखील टीआरपी चांगलाच घसरलेला पाहायला मिळतो. तर इकडे सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या मालिकेत देखील असच चित्र पाहायला मिळतंय. प्रेक्षक आता जागरूक झालेले पाहायला मिळतात. जी मालिका भरकटते ती बाजूला ठेऊन नवीन पर्याय शोधताना पाहायला मिळतात. येत्या काही दिवसात देवमाणूस ही लोकप्रियता मिळवलेली मालिका पुन्हा एकदा नव्या रुपात पाहायला मिळणार आहे “देवमाणूस २” चा प्रोमो देखील झी मराठीने नुकताच प्रसिद्ध देखील केला आहे, पण त्यात मालिकेला कितपत यश मिळेल हे येणार काळच ठरवेल.