Breaking News
Home / जरा हटके / येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्रीचे होणार आगमन

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्रीचे होणार आगमन

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओम आणि स्वीटू पुन्हा एकत्र यावेत म्हणून नलू आणि शकू धडपडताना दिसत आहेत. ओम आणि स्वीटूच्या लग्नात स्वीटूचे वडील दादा साळवी हे गायब झाले होते. त्यांना शोधण्यासाठीच ओम लग्न मंडप सोडून निघून गेला होता. त्यामुळे स्वीटू ओमवर नाराज झाली होती. ते दोघेही पुन्हा एकत्र यावेत आणि ओमने असे का केले हेही स्वीटूला समजावे म्हणून त्या दोघींनी त्यांची भेट घडवून आणली होती. मात्र त्या दोघांमधील नात जुळण्यापेक्षा ते एकमेकांपासून आणखीनच दुर जाताना दिसत आहे.

sweetu and om
sweetu and om

याच पार्श्वभूमीवर या मालिकेत आता एका नव्या अभिनेत्रीचे आगमन होणार आहे. हे पात्र स्वीटू आणि ओमला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. मालिकेत नव्याने दाखल होत असलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव आहे “प्रिया मराठे”. लवकरच प्रिया मराठे येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतून महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेबाबत बोलताना प्रिया म्हणते की, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मी एका तगड्या भूमिकेत दिसणार आहे. ओम आणि स्वीटूला एकत्र आणण्याचे काम मी करणार आहे”. प्रिया मराठेने नुकतेच सुमित्रा प्रॉडक्शन हाऊस निर्मित “सेकंड मदर” या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.या चित्रपटातून ती शंतनू मोघे यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटातून रिअल लाईफ नवरा बायको एकत्रित स्क्रीन शेअर करत आहेत. तर सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतूनही ती ‘रायबागन’ च्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. आता लवकरच प्रिया येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतून झी मराठी वाहिनीवर पुन्हा एकदा दिसणार आहे.

actress priya marathe
actress priya marathe

‘या सुखांनो या’ या झी मराठीच्या मालिकेतून प्रियाचे मराठी मालिका क्षेत्रात पदार्पण झाले होते. चार दिवस सासूचे, तू तिथे मी या मराठी मालिकेतून ती महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली. पवित्र रिश्ता, कसम से, उतरण, बडे अच्छे लगते है, सावधान इंडिया अशा अनेक हिंदी मालिकेतून देखील तिच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळाला होता. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेला महा एपिसोडमुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. ओम आणि स्वीटू यांचे लग्न न लावता स्वीटू मोहितशी लग्न करणार हे प्रेक्षकांना अपेक्षित नव्हते. याच नाराजी मुळे आणि घसरलेला टीआरपी वाढवण्यासाठी मालिकेत प्रिया मराठेची एन्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रिया मराठे प्रेक्षकांची नाराजी दूर करेलच शिवाय घटलेला टीआरपी देखील वाढवण्यात यशस्वी होईल असा विश्वास वाटतो.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *