Breaking News
Home / जरा हटके / येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील चिन्या साकारणाऱ्या अभिनेत्याचे वडील देखील आहेत अभिनेते

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील चिन्या साकारणाऱ्या अभिनेत्याचे वडील देखील आहेत अभिनेते

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. लवकरच मालिकेत ओम आणि स्वीटूच्या लग्नाची लगबग देखील पाहायला मिळणार आहे. ओम, स्वीटू, शकू, नलू , दादा, मालविका या पात्रांमुळे मालिकेला खरा रंग चढत गेला. यात महत्वाचं म्हणजे चीन्याचे पात्र देखील भाव खाऊन जाताना दिसले. वेळोवेळी ओम आणि स्वीटूला मदत करणारा हा चिन्या साकारलाय “अर्णव राजे” या कलाकाराने. अर्णव राजेची निवड चिन्याच्या भूमिकेसाठी करण्यात आली ती ओघानेच. पाहुयात त्याला ही मालिका कशी मिळाली ते…

actor arnav raje
actor arnav raje

शाळेत असल्यापासूनच अर्णवला अभिनयाची आवड होती. त्यामुळे बालपणीच त्याने नाट्य अभिनय कार्यशाळेत सहभाग दर्शवून अभिनयाचे बारकावे शिकण्यास सुरुवात केली. अर्णवचे वडील “जयेश राजे” हे देखील अभिनय क्षेत्रातच कार्यरत असल्याने घरातूनच त्याला अभिनयाचे मार्गदर्शन मिळत गेले. जयेश राजे यांनी काही शॉर्टफिल्म साकारल्या आहेत तर ‘रेस्ट इन पीस’ ही सिरीज देखील अभिनित केली आहे. २०१९ मध्ये अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिव्हल आयोजित केले होते या फेस्टिव्हलच्या सादरीकरणात जयेश राजे यांनी शॉर्ट फिल्म द्वारे मार्गदर्शन केले होते. माझे वडीलच माझ्यासाठी अभिनयातले पहिले गुरू आहेत असे तो सांगतो. पुढे देवेंद्र पेम यांच्या अभिनय कार्यशाळेत देखील त्याने अभिनयाचे धडे गिरवले. रुपारेल कॉलेजमध्ये असताना नाटकांतून विविधांगी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यातून अनेक नाट्य स्पर्धा गाजवल्या. ‘भाग धन्नो भाग’ ही गाजलेली एकांकिका सादर करत असताना सुवर्णा राणे यांनी अर्णवला हेरलं. सुवर्णा राणे या येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करतात.

actor jayesh raje
actor jayesh raje

आम्हाला जसा चिन्या हवाय अगदी तसाच तू आहेस असे मत सुवर्णा राणे यांनीअर्णवच्याबाबतीत व्यक्त केले होते. अशा प्रकारे चिन्याच्या पात्रासाठी अर्णवची निवड करण्यात आली. पदार्पणातच अर्णवला झी मराठी वाहिनीसारखा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. मालिकेतून त्याने साकारलेला चिन्या प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. आपले कुटुंब, बहिणीच्या बाबतीत दाखवलेला हळवा आणि तितकाच हजरजबाबी चिन्या प्रेक्षकांनाही तितकाच भावला आहे. नवीन चेहरा प्रेक्षक लवकर आपलंस करताना पाहायला मिळत नाहीत पण चिन्याच्या कॅरॅक्टर मुळात आहेच खूप छान त्यामुळेच अर्णवला देखील चिन्या साकारण्यात मजा येत असल्याचं तो सांगतो. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील अर्णव राजेने साकारलेला चिन्या त्याच्या अभिनयाने उत्तरोत्तर खुलत राहो हीच सदिच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *