
झी मराठी वाहिनीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत नुकतेच स्वीटू आणि ओमचे लग्न झाले आहे. त्यामुळे मालिकेत सध्या त्या दोघांचे रोमँटिक सीन्स पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे ओमच्या आई म्हणजेच शकू मावशी गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. ही बाब त्या सगळ्यांपासून लपवून ठेवत आहेत. मात्र शकू मावशी आपल्यापासून काहीतरी लपवतीये हे स्वीटूला समजते आणि ती शकू मावशीचे रिपोर्ट त्यांच्या खोलीतून गुपचूप घेऊन येते. येत्या काही दिवसात मालिकेतला ट्रॅक शकू मावशी आणि स्वीटूला अधिक जवळ करणारा ठरणार आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत चिन्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चिन्या त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलताना दिसला. आणि आता तो चक्क तिला घेऊन साळवी कुटुंबात दाखल झाला आहे. चिन्याची गर्लफ्रेंड पाहून मात्र घरच्यांचा गोंधळ उडालेला आहे. मालिकेत चिन्याच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे सुवेधा देसाई. सुवेधा देसाई हिने याअगोदर दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय मालिकेतून किंजलची भूमिका साकारली होती. सुवेधा देसाईने किंजलचे पात्र भन्नाट निभावले होते. गुजराथी भाषिक किंजल आशूच्या प्रेमात होती ती आशूला इंग्रजी शिकवायची. यातून उडणारी धमाल प्रेक्षकाना मात्र खूपच भावली होती. असेच काहीसे पात्र ती येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत देखील निभावताना दिसत आहे. वैजू नं १ या मालिकेतूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. नुकतेच तिने महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये हजेरी लावली होती. समीर चौगुले यांच्यासोबत तिने एक स्किट सादर केले होते. सुवेधा देसाई हिचे युट्युब चॅनल देखील आहे. या युट्युब चॅनलवर अनेक भन्नाट व्हिडीओ ती पोस्ट करत असते. तिच्या या व्हिडिओजना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

सुवेधा देसाई ही मुंबईत लहानाची मोठी झाली.ठाकूर कॉलेज आर्टस् अँड सायन्स मधून तिने शिक्षण घेतले होते. यासोबतच तिने एकांकिका स्पर्धांमधून सहभाग दर्शवला होता. दिल दोस्ती दुनियादारी मालिकेमुळे सुवेधा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. सागर गवाणकर यांच्याशी सुवेधा देसाईने लग्नगाठ बांधली. सागर गवाणकर हेही मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. दिग्दर्शनासोबतच त्यांनी लेखक म्हणूनही भूमिका बजावल्या आहेत. Soul met या हॉरर वेबसिरीज त्यांनी बनवली आहे ज्यात सुवेधा मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती. आता येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतून ती चिन्याची गर्लफ्रेंड साकारत आहे. तिच्या येण्याने साळवी कुटुंबात मात्र पुरता गोंधळ उडालेला आहे. चिन्यासोबत तिचे लग्न लावून दिले जाणार का हे येत्या काही दिवसातच प्रेक्षकांसमोर येईल. तूर्तास या नव्या भूमिकेसाठी सुवेधा दिसाईचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…