धक्कादायक ! मालिकेत आणि चित्रपटात काम मिळवण्यासाठी एकदा नाही तर दोनदा आला होता हा वाईट अनुभव

येऊ कशी तशी मी नांदायला ह्या मालिकेत आता ओम स्वीटूच्या घराजवळ रूम भाड्याने घेऊन स्वतःच्या मेहनतीने २५ हजार १५ दिवसात कमवून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला कुठेच काम मिळाले नाही म्हणून तो आता भाजी विक्रेत्याचे काम करताना पाहायला मिळतोय. स्वीटू आणि ओम ह्यांच्या लग्नातील अडथळे वाढवण्यासाठी मालविका आता ओम ने थाटलेला भाजीचा धंदा देखील उध्वस्त करण्याचा प्रयत्न करतेय. ह्या मालिकेत ओम सोबत लग्नासाठी मालविकाने मोमो ची निवड केलीय त्यासाठी ती काहीही कारस्थान करायला देखील तय्यार आहे. मोमो साकारणाऱ्या अभिनेत्रीने नुकतीच एक धक्कादायक घटना चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

मोमो च पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीच नाव आहे मीरा जगताप. मीरा ने नुकतीच एक घटना चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यात ती म्हणते मालिकांत काम मिळवण्यासाठी मला अनेक वाईट अनुभव आले, एकदा नाही तर दोनदा एकाच व्यतींकडून मला असा वाईट अनुभव आलाय, तू नवीन आहेस, तुला कोणी ओळखत नाही. त्यामुळे तुला हे करावं लागल असं मला सांगायचं आहे. पण मी ते नाकारलं, एखाद काम मिळवण्यासाठी शॉर्टकट मला मुळीच पसंद नाहीत. एखादी मालिका किंवा चित्रपट चुकीच्या पद्धतीने मिळवून आपला आत्म विश्वास त्यासाठी गमावणे मला मुळीच पसंद नाही. मला मालिका मिळवून देतो अश्या बहाण्याने त्याने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला पण मी त्याला त्याचवेळी कानाखाली लगावून तेथून निघून गेले. त्यानंतर पुढची दोन वर्ष मी कोणतीच मालिका करू शकले नाही कारण मी खूप तणावात गेले होते. पण आता तिने कमबॅक करत येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत मोमो ची भूमिका साकारत आहे. मोमो च पात्र हे मीरा जगताप हिच्या खऱ्या आयुष्याच्या खूप वेगळं आहे. मीरा जगताप हि खऱ्या आयुष्यात खूप सिम्पल आहे.

मीरा जगताप प्रमाणे ह्यापूर्वी देखील अनेक मराठी अभिनेत्रीनं काम मिळवण्यासाठी वाईट अनुभव आलेले त्यांनी सांगितले आहेत. फक्त बॉलीवूड मधेच नाही तर मराठी फिल्म मिळवण्यासाठी महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण बऱ्याच महिला पुढे येऊन त्या घटना सांगण्याचं टाळतात. मीरा जगताप हिने घडलेल्या ज्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे त्या व्यक्तीच नाव मात्र तिने घेतलं नाही. महिला पुढे येऊन वाद वाढवून घेण्यापेक्षा गप्प राहून फिल्म आणि मालिकेतून येण्यापेक्षा काहीतरी वेगळं काम कारण पसंत करतात. बॉलीवूड असो टॉलीवूड असो वा मराठी इंडस्ट्री अश्या अनेक लोकांना महिलांना तोंड द्यावं लागत त्यामुळे अनेक कलाकार महिलानी अभिनयाला रामराम देखील ठोकला आहे.