येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत स्वीटूने ओमकारला प्रेमाची कबुली दिली आहे. हा रंजक एपिसोड दोन दिवसातच तुम्हाला मालिकेतून पाहायला मिळणार आहे. तुर्तास मालिकेतील मोहितच्या आईबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास जाणून तुम्ही या अभिनेत्रीचे नक्कीच कौतुक कराल याची खात्री आहे. कारण मोहितच्या आई खऱ्या आयुष्यात केवळ अभिनेत्रीच नाही तर त्या उत्तम गायिका आणि उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहेत. इतकच नाहीतर यापूर्वी देखील अनेक मालिकात त्यांनी काम देखील केले आहे. जाणून घेऊयात याबाबत अधिक…

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतून मोहितच्या आईची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “कोमल धांडे-पाठारे” यांनी. हे विरोधी पात्र असल्याने प्रेक्षकांच्या रोषाला त्याना सामोरे जावे लागत आहे हीच त्यांच्या सहजसुंदर अभिनयाची पावती म्हणावी लागेल. वयाच्या ५ व्या वर्षांपासूनच त्यांच्या वडिलांनी त्यांना भरतनाट्यमचे धडे देण्यास सुरुवात केली होती. योग्य वयात आई वडिलांचे, शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्याने त्या कला क्षेत्रात घडत गेल्या असे त्या आवर्जून सांगतात. शास्त्रीय नृत्य शिकता शिकता गण्याचीही गोडी त्यांच्यात निर्माण होत गेली . नृत्य गुरू विमला नायर यांनी त्यांचे कलागुण हेरून गायन आणि अभिनयात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. दहावीनंतर दिग्दर्शक जयदेव हट्टंगडी यांच्याकडे नाट्य अभिनयाचा ३ महिन्याचा कोर्स केला. लहानवयात नृत्याचे सादरीकरण करताना स्टेज डेअरिंग वाढले याचा फायदा अभिनय करताना झाला. गोष्ट तुझी माझी हे नाटक त्यांनी साकारल त्यात गाणं गाण्याची आणि नृत्य सादर करण्याची नामी संधी त्यांना मिळाली.

संगीत विषयातून एमएची पदवी प्राप्त झाल्यानंतर मुंबई विद्यापीठातून शास्त्रीय संगीतातून डिप्लोमा केला. आता संगीतातून त्यांना पीएचडी देखील करायची अशी त्यांची ईच्छा आहे. कोमल धांडे यांनी आजवर अनेक मंचावरून अप्रतिम गाण्यांचे सादरीकरण केले आहे. युट्यूबवर त्यांनी स्वतःचे चॅनल सुरू केले आहे त्यात अनेक अमराठी गाणी देखील त्यांनी आपल्या आवाजात गायली आहेत. ‘ये लावणीचे बोल कौतुके’, ‘जिजाऊ जन्मोत्सव’ अशा कार्यक्रमात त्यांनी गाणी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. कोमल धांडे या त्यांच्या युट्युब चॅनलवर लाखो सबस्क्राईबर्स आहेत. Kanne adhirindhi …त्यांनी गायलेल्या या गाण्याला प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतीसाद मिळाला आहे. गायन, नृत्य आणि अभिनय हा आपला श्वास मानणाऱ्या कोमल धांडे सध्या येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतून विरोधी भूमिका साकारत आहेत हे पात्र लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार असले तरी त्यांची भूमिका प्रेक्षक विसरू शकणार नाहीत. यापूर्वीही त्यांनी माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत शनायाला मदत करणारी नगरसेविका हे विरोधी पात्र साकारलं होत. कोमल धांडे यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा …