काही दिवसांपासून एका व्यक्तीचा ट्रेन मधील हा फोटो चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतोय. ह्या फोटोमध्ये एक व्यक्ती ट्रेनमध्ये एका दोरीच्या साहाय्याने झोका बनवून तोल घेत त्यावर झोपताना दिसतोय. अनेकांनी ह्या व्यक्तीच कौतुक केलेलं पाहायला मिळतंय तर काहींनी हे हसण्यावारी घेतलेलं पाहायला मिळते. आम्ही मुंबईचे नाहीत आम्हाला काय करायचंय. काम करण्यापेक्षा धंदा करा अश्या अनेक कमेंट पाहायला मिळतात काहींनी तर पातळीही ओलांडलेली पाहायला मिळते. पण मित्रानो प्रकरण खूपच गंभीर आहे. आपण फक्त फोटो पाहून कमेंट करतो त्या मागचा त्रास संघर्ष मात्र आपल्याला दिसत नाही. एखाद्या मालिकेत हाच प्रकार दाखवला कि मात्र आपल्याला ह्याच गांभीर्य समजत. टीव्ही मधील त्या कलाकारांचं दुःख आपल्याला दिसतं पण खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना आपण पाहून देखील न पाहिल्या सारखं करतो.

अहो आजही असे अनेक कामगार लोक आहेत जे वसई विरार कल्याण बदलापूर अंबरनाथ इतकंच काय तर चक्क पुण्याहून मुंबई असा रोजचा १-२ तासाचा ट्रेनने प्रवास करतात. काय गरज असेल ह्यांना कामासाठी इतका प्रवास करण्याची ? काय असेल ह्यामागचं कारण? आपण कधी जाणून घेत नाही.नोकरी बदला किंवा जिथे काम करता तेथे जवळपास राहायला जा हे अनेकांचं मत असेल. पण त्यामागेही अनेक करणे आहेत. घरात म्हातारे आई वडील त्यांना सांभाळत त्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी होणारा खर्च. मुलंबाळं त्यांचं शिक्षण कॉलेज शाळेच्या फी अगदी सामान्य माणसाच्या खिशाला परवडणार नाही म्हणून लोन काढून उसनवारी घेऊन त्याचे हफ्ते फेडायचे म्हणून रोज न थकता न कंटाळता हा १-२ तासांचा प्रवास गर्दीत उभ्या उभ्या करायचा. अहो सांगणार तरी कोणाला कोण आपलं गाऱ्हाणं ऐकून घेणार अहो मुला मुलींचं लग्न त्यावर होणार खर्च सर्वांची जाण ठेवावी लागते. रोजच्या कंटाळवाण्या प्रवासातून कंबर दुखत असेल पाय दुखत असतील तरी देखील इतका मोठा प्रवास करून ८ तास काम करावंच लागत ‘रोजचंच मढ त्याला कोण रड’ म्हणायला सोपं आहे पण खऱ्या आयुष्यात असा १ दिवस काढून पहा मग तुम्हाला ह्यमागचं कारण समजेल. जोवर एखाद्या व्यक्तीला आपण अभिनयाच्या माध्यमातून पाहत नाही तोवर आपल्याला त्यामागचा संघर्ष दिसत नाही. पुरुषनपेक्षा स्रियांचा त्रास तर आणखीनच जास्त आहे. घरची कामे करून टायमावर घरातून निघावं लागतं ९ चा टाइम असेल तर सकाळी ५ वाजल्यापासून घरातील कामाला सुरवात करावी लागते. अहो कोणाला श्रीमंतीत ऐशो आरामात राहावंसं वाटत नाही पण इथे फक्त आपला विचार नसतो घरातल्या प्रत्येकाला सांभाळत त्यांच्या गरजा होतील तश्या पूर्ण करत जगायचं असत. मग आपल्या गरजांना बाजूला ठेवत असंच झटावं लागतं मरत मरत जगावं लागत..