८ गावातील संपूर्ण महिलांच्या नावावर लोन काढून महिला फरार … तब्बल ५ कोटींची फसवणूक झाल्याने गावकरी उतरले रस्त्यावर
थोड्याफार पैश्यासाठी माणूस नाही त्या स्कीममध्ये पैसे गुंतवतो आणि मग आयुष्यभर त्याची फळ भोगतो. ग्रामीण भागातील अडाणी लोकच नाही तर शहरातील सुशिक्षित लोक देखील ह्याला बळी पडतात. मुंबईत नुकताच घडलेला ‘टोरेस’ कंपनीचा ३ हजार कोटींचा मोठा घोटाळा ह्याच उत्तम उदाहरण आहे. आता ग्रामीण भागात देखील असाच एक घोटाळा उघडकीस आला आहे. ह्या घोटाळ्यामुळे तब्बल ८ गावच्या संपूर्ण महिला अडचणीत आल्या आहेत आणि प्रत्येक महिलेच्या डोक्यावर ३० ते ४० हजार रुपयांचं कर्ज झालं आहे.
कसा झाला हा घोटाळा –
संगीता देवी ह्या महिलेने बिहारमधील खगड़िया जिल्ह्यातील परबत्ता आणि आजूबाजूच्या तब्बल ८ गावामध्ये जाऊन महिलांना शॉर्ट टर्म लोन घेऊन दिल. हे लोन देणारे (L अँड T आणि आणखीन २) कंपनीतील कामगार देखील ह्या फ्रॉडमध्ये सहभागी असल्याचा ह्या महिलांचा आरोप आहे. आधी लोन काढून गव्हर्मेंट स्कीममध्ये हे पैसे जमा करणार असं आश्वासन दिल गेलं. काढलेल्या लोन चे हफ्ते देखील गव्हर्मेंट खात्यातूनच वजा होईल शिवाय महिन्याला राशन, टॉयलेट, तसेच घर बनवण्यासाठी खर्च शिवाय महिना १ हजार रुपये देखील महिलांच्या नावे जमा होईल असं सांगितलं गेलं.
संगीता देवी हि महिलांच्या खात्यावर शॉर्ट टर्म लोन आल्यावर त्यांच्याकडून पैसे घेत असे. ज्यांना लोन मिळालं नाही त्या महिलांचे ग्रुप बनवून वेगवेगळ्या मार्गाने तिने ह्या महिलांना कर्ज काढून दिल. आणि मिळालेले पैसे गव्हर्मेंट स्कीममध्ये जमा करणार सांगत असे. भोळ्याभाबड्या महिला कोणतीही विचारपूस न करता तिच्या जाळ्यात अडकल्या. संगीता देवी हि महिला त्याच गावची रहिवाशी असल्याने लोकांना ती फसवणार नाही असं वाटत होत. पण आता हि महिलाच गाव सोडून फरार झाली आहे. त्यामुळे संपूर्ण गाव रस्त्यावर उतरलं आहे कोणीतरी आपली मदत करेल अशी ह्या महिलांना आशा आहे कारण आता शॉर्ट टर्म लोन काढलेल्या कंपन्यानी घेतलेल्या पैश्यांचे हफ्ते मागायला सुरवात केली आहे. थोड्याफार पैश्यासाठी माणूस अश्या लोकांच्या जाळ्यात अडकतो आणि मग त्याला आर्थिक अडचणी, त्रासाला समोर जावं लागत.