१५ वर्षांनी पुन्हा आलाय भूलभूलैय्या २ चित्रपट प्रोमो होतोय वायरल पण प्रेक्षक म्हणतायेत काहीतरी चुकतय

२००७ साली पडदयावर आलेल्या भूलभुलैय्या या सिनेमाने मंजुलिका हे पात्र चांगलच लोकप्रिय केलं होतं. चतुर्वेदी कुटुंबाला घाबरवून सोडणाऱ्या या मंजुलिकाची मोहिनी लाखो प्रेक्षकांनी अनुभवली. एक वेगळ्या धाटणीचा भयपट असलेल्या भूलभुलैय्या सिनेमाचा सिक्वेल १५ वर्षांनी प्रदर्शित होणार आहे. पण हा दुसरा भाग घाबरवणारा नसून हसवणारा असल्याचं ट्रेलरमधून दिसतंय. भूलभूलैय्या प्रेमींना या सिनेमाचा सिक्वेल येणार त्याचा आनंद तर आहेच. पण अक्षयकुमारने साकारलेला मनोविकारतज्ज्ञ आणि केसांची जाळी करून घाबरवणारी मंजुलिका म्हणजे विद्या बालन नव्या संचात नसणार हे पाहून प्रेक्षक खट्टू झाले आहेत.

गेल्या काही वर्षात सिनेमाच्या ट्रेंडकडे नजर टाकली तर एकेका कथेचे चार ते पाच भाग प्रदर्शित करण्यावर भर दिला जात आहे. असाच प्रयोग करत झळकणारा भूलभूलैय्या २ हा सिनेमा पहिल्या भागाप्रमाणे घाबरवणारा नसून लोटपोट हसवणारा तर आहेच पण पहिल्या सिनेमातील कथेपासूनही वेगळा असल्याचं ट्रेलरमधून दिसतय. चाहत्यांना मात्र या सिनेमाच्या सिक्वेलच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे. अक्षय कुमार आणि विदया बालनच्या जागी या सिक्वेलमध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीची केमिस्ट्री दिसणार आहे. तर तब्बूचीही खास भूमिका आहे. नव्या संचातील ट्रेलर पाहून प्रेक्षक मात्र अक्षयकुमार, विदया बालन, परेश रावल, शायनी आहुजा, अमिषा पटेल यांची उणीव भासत असल्याची कमेंट करत आहेत. सिध्दार्थ चतुर्वेदी आणि अवनी यांच्या लग्नानंतर सुरू होणारी भूलभूलैय्या या सिनेमाची गोष्ट म्हणजे एक गूढ भयकथा होती. भूलभूलैय्याची ती भट्टी अशी काही जमली की काही विचारूच नका. खरंतर गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये या सिनेमाचा सिक्वेल येणार होता, पण करोनामुळे या सिनेमाच्या शूटिंगमध्ये खो आला. आता येत्या २० मे ला हा सिनेमा प्रदर्शित होणा आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना आनंद झाला आहे.
भूलभूलैय्या २ मध्ये मात्र कलाकारांपासून कथानकापर्यंत सगळच चित्र बदलल्याने काही प्रेक्षकांचा हिरमोड झाला असला तरी भूलभूलैय्या २ पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनके प्रेक्षकांनी ह्यावर मत मांडत आम्हाला चित्रपट पाहायला नक्कीच आवडेल असं म्हटलं आहे. सस्पेन्स असलेले चित्रपटांना भारतीय प्रेक्षक नेहमीच डोक्यावर घेताना पाहायला मिळतात मात्र एकीकडे अक्षय कुमार आणि विद्या बालन चित्रपटात पाहायला मिळणार नसल्याची खंत देखील प्रेक्षक मांडताना पाहायला मिळत आहेत असो येणाऱ्या २० मे रोजी हा चित्रपट प्रेक्षक गृहात धुमाकूळ गाजवतो कि नाही हे पाहायला मिळेलच. भूलभुलैया २ चित्रपटाला आमच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा…