नुकताच भारत आणि वेस्ट इंडीज टी २० सामने झाले भारताने हि मालिका २-१ अशी जिंकली. क्रिकेट म्हटलं कि वेस्ट इंडीज संघाला खूप महत्व आहे खास करून आयपीएल संघात या खेळाडूंना जास्त महत्व आहे, सुरवातीपासूनच अनेक फास्ट गोलंदाज आणि धडाकेबाज बॅट्समन असलेल्या ह्या क्रिकेटर खेळाडूंची नावे हि भारतीय असल्याची दिसून येतात. सुनील नारायण, राम नरेश सरवान, दिनेश रामदिन, शिवनारायण चंदरपॉल असे अनेक खेळाडूं ज्यांची नावे भारतीय नावांशी आणि भारतीय देवांशी मिळती जुळती आहेत. नावात सुनील, दिनेश, राम, शिव, नारायण, चंद्र आणि सूर्य पाहायला मिळतात. इतकंच नाही तर ते भारतीय पद्धतीने लग्न देखील करतात. मग हि मंडळी नक्की आहेत तरी कोण ह्याची रंजक कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत…

मित्रानो ह्याची सुरवात झाली ती ब्रिटिश काळापासून जेंव्हा इंग्रजांचं भारतावर राज्य होत. त्यावेळी फक्त भारतच नाही तर अनेक देश इंग्रजांच्या ताब्यात होते. मग जिथे लोकांची आणि कामगारांची कमतरता पडेल तिथे इंग्रज भारतीय लोकांना घेऊन जात आणि ह्याचा त्यांना चांगला मोबदला देखील दिला जातो हे पाहून अनेक भारतीय लोक जहाजाने देश विदेशात जाऊन काम करू लागले. पण हळूहळू ह्या कामगारांचे हाल होऊ लागले आणि मिळणार मोबदला देखील फारच कमी मिळू लागला. अश्या कामगारांना “गिरमिटिया” किंवा “जहाजी” म्हणून संबोधलं जायचं हे भारतीय मजूर होते ज्यांना ब्रिटिश साम्राज्याने फिजी, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका आणि कॅरिबियन येथे पाठवले. ब्रिटीश सत्तेला कंटाळून ह्या कामगारांनी आहे तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. जे हे क्रिकेटर आहेत ते बरेचसे भारतीय आणि हिंदूच आहेत, जे कॅरिबिया येथे स्थायिक झाले. यामुळेच अनेक कॅरिबियन गाण्यातही राम आणि शिव अश्या देवांचा उल्लेख पाहायला मिळतो.

तुम्हाला हे आठवत असेल कि ज्यावेळी वेस्ट इंडीज क्रिकेट संघाकडे खेळायला पैसे देखील राहिले नव्हते तेंव्हा भारताने त्यांना मदत केली होती. ज्यावेळी वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने टी २० विश्वकप जिंकला तेंव्हा देखील त्यांनी आमच्याच लोकांनी आम्हाला मदत केल्यामुळे हे शक्य झाल्याचं म्हटलं होत. आयपीएल सामन्यातही वेस्ट इंडीज क्रिकेट संघातील खेळाडू जास्त दिसण्यामागचं कारण देखील हेच आहे. इतकंच नाही तर अनेक वेस्ट इंडीज क्रिकेटर भारतीय मुलींशीच लग्न करताना पाहायला मिळतात. पण आपल्याला इतिहास माहित नसल्यामुळे आपण हे सगळं पैश्यांसाठी चाललंय असच म्हणतो, कारण आपण कधी मुळात जाऊन शोधण्याचा प्रयत्न करत नाही. सर्व काही पैश्यासाठी हे साधं सोपं वाक्य ह्यामुळेच लोक कुठेही वापरतात. असो आपलेच बंधू असलेल्या कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघाला ह्या टी२० विश्वकप साठी खूप खूप शुभेच्छा…